सॅल्यूट नागपूर पोलीस; कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2021 10:51 PM2021-12-17T22:51:33+5:302021-12-17T22:52:04+5:30

Nagpur News ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक लीलाताई चितळे यांच्या हस्ते शहरातील पोलीस अधिकाऱ्यांच्या कर्तव्याला सलाम करतानाच त्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

Salute Nagpur Police; Honoring the dutiful police officers | सॅल्यूट नागपूर पोलीस; कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार

सॅल्यूट नागपूर पोलीस; कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार

googlenewsNext
ठळक मुद्दे मान्यवरांकडून काैतुक

नागपूर - ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक लीलाताई चितळे यांच्या हस्ते शहरातील पोलीस अधिकाऱ्यांच्या कर्तव्याला सलाम करतानाच त्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या पाठीवर काैतुकाची थाप ठेवण्याच्या उद्देशाने श्री स्वामी समर्थ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एम्प्रेस मॉलमधील नक्षत्र सभागृहात गुरुवारी सायंकाळी हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी सहपोलीस आयुक्त अस्वती दोरजे, अतिरिक्त पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस उपायुक्त सारंग आवाड, उपायुक्त बसवराज तेली, उपायुक्त चिन्मय पंडित, उपायुक्त अक्षय शिंदे, उपायुक्त गजानन राजमाने, उपायुक्त मनीष कलवानिया तसेच शहरातील बहुतांश पोलीस ठाण्याचे ठाणेदार, ॲड. समीर सोनवणे आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. संस्थाध्यक्ष नूतन रेवतकर यांनी प्रारंभी कार्यक्रमाचा उद्देश विशद केला. लीलाताई चितळे यांनी यावेळी पोलिसांच्या कार्याची प्रशंसा केली.

थोडे चुकले की पोलिसांच्या नावाने लगेच शिमगा केला जातो. मात्र, त्यांनी चांगले कर्तव्य बजावले तर काैतुकाची थाप दिली जात नाही. कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी अशा कार्यक्रमाचे आयोजन व्हावे, अशी प्रतिक्रिया यावेळी उपस्थितांनी नोंदविली. कार्यक्रमाचे संचालन आणि आभारप्रदर्शन पूनम रेवतकर यांनी केले.

---

Web Title: Salute Nagpur Police; Honoring the dutiful police officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस