महिला सफाई कर्मचाऱ्यांच्या सेवेला सलाम : लहान मुलं असूनही कोरोना युद्धात सहभाग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2020 07:17 PM2020-05-07T19:17:07+5:302020-05-07T19:21:05+5:30

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कार्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. प्रत्येक जण कुटुंबातील सदस्यांच्या सुरक्षेसाठी घरातच थांबला आहे. मात्र कोरोना युद्धात अत्यावश्यक सेवेतील डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचारी व प्रशासनातील अधिकारी लढा देत आहेत. यात लहान मुले असूनही अनेक महिला सफाई कर्मचारी भीती न बाळगता शहर स्वच्छ ठेवून कोरोना युद्धात लढा देत आहेत.

Salute to the service of women cleaners: Corona participates in the war despite having children! | महिला सफाई कर्मचाऱ्यांच्या सेवेला सलाम : लहान मुलं असूनही कोरोना युद्धात सहभाग!

महिला सफाई कर्मचाऱ्यांच्या सेवेला सलाम : लहान मुलं असूनही कोरोना युद्धात सहभाग!

googlenewsNext
ठळक मुद्दे शहर स्वच्छ ठेवण्याची घेतात काळजी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कार्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. प्रत्येक जण कुटुंबातील सदस्यांच्या सुरक्षेसाठी घरातच थांबला आहे. मात्र कोरोना युद्धात अत्यावश्यक सेवेतील डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचारी व प्रशासनातील अधिकारी लढा देत आहेत. यात लहान मुले असूनही अनेक महिला सफाई कर्मचारी भीती न बाळगता शहर स्वच्छ ठेवून कोरोना युद्धात लढा देत आहेत.
शहर स्वच्छ ठेवण्यात महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांची महत्त्वाची भूमिका आहे. कोरोनाची सर्वत्र दहशत असतानाही सफाई कर्मचारी शहरातील बाजार परिसर, रस्ते स्वच्छ करण्यासोबतच घराघरातून कचरा संकलनाचे काम करीत आहेत. रोज पहाटे कामावर हजर होतात. रस्ते स्वच्छ करण्याची सोपविलेली जबाबदारी पार पाडून शहरातील नागरिकांची काळजी घेतात. जंतुनाशक फवारणी, सॅनिटयझर फवारणी करून परिसर निर्जंतुक करण्याची जबाबदारी सफाई कर्मचारी पार पाडत आहेत.

मनपा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करीत गांधीबाग-महाल झोन मधील प्रभाग क्रमांक २२ मध्ये कार्यरत नेहा सोनू मार्वे व रिंकी सुरेंद्र जनवरे या महिला सफाई कर्मचाºयांना एक वर्षाच्या आतील मुलं असतानाही सफाईचे काम करीत आहेत. विशेष म्हणजे कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेला सतरंजीपुरा व मोमिनपुरा परिसर गांधीबागला लागूनच आहे. अशा परिस्थितीत संसर्गाचा अधिक धोका आहे. असे असूनही नेहा मार्वे व रिंकी जनवरे आपले कर्तव्य बजावत आहेत. लहान मुले असल्याने त्यांना संसर्ग होणार नाही याची विशेष खबरदारी घ्यावी लागत आहे.
.........

हॉटस्पॉट भागातही सेवा
शहरातील स्वच्छतेसोबतच कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या भागात साफसफाईचे काम सुरू आहे. स्वच्छता करताना झोनमधील विविध भागात जावे लागते. अशावेळी कोणत्या भागात कोरोनाबाधित व्यक्ती असेल हे सांगता येत नाही. अशावेळी संसर्गाचा अधिक धोका असतो. असे असूनही सफाई कर्मचाºयांची सेवा निरंतर सुरू आहे. उलट कोरोनामुळे स्वच्छतेची जबाबदारी आणखी वाढली आहे. अशाही परिस्थितीत सफाई कर्मचारी आपली सेवा देत आहेत.

.......
मनपा सेवेत आठ हजार सफाई कर्मचारी

शहरातील क चरा संकलनाची जबाबदारी बीव्हीजी व एजी एन्व्हायरो या दोन खासगी कंपन्यांवर सोबविली आहे. कंपन्यांकडे १८०० सफाई कर्मचारी आहेत. तर शहरातील बाजार, रस्ते वा सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी मनपाचे सहा हजार सफाई कर्मचारी सांभाळत आहेत. यात महिला कर्मचाºयांची संख्या मोठी आहे.
...

Web Title: Salute to the service of women cleaners: Corona participates in the war despite having children!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.