समर्पण भावनेने रुग्णसेवा देणाºया परिचारिकांच्या कर्तुत्वाला सलाम-डॉ. अविनाश गावंडे

By सुमेध वाघमार | Published: May 12, 2024 07:43 PM2024-05-12T19:43:47+5:302024-05-12T19:43:58+5:30

मेडिकलमध्ये जागतिक परिचारिका दिन साजरा

Salute to the dedication of nurses who provide patient care-Dr. Avinash Gawande | समर्पण भावनेने रुग्णसेवा देणाºया परिचारिकांच्या कर्तुत्वाला सलाम-डॉ. अविनाश गावंडे

समर्पण भावनेने रुग्णसेवा देणाºया परिचारिकांच्या कर्तुत्वाला सलाम-डॉ. अविनाश गावंडे

नागपूर: प्रत्येक नात्यात व्यवहार शोधणाºया आजच्या काळात नोकरीही फारच व्यावसायिक पद्धतीने केली जाते. परंतु नोकरीचे काही क्षेत्र असे आहेत ज्याच्या सेवेला नजरेआड करताच येत नाही. नर्सिंग हे त्यातलेच एक क्षेत्र. समर्पण भावनेने रुग्णसेवा देणाºया परिचारिकांच्या कर्तुत्वाला सलाम, असे मत मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी येथे व्यक्त केले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नर्सिंग कॉलेज, इंद्रधनुष बहुउद्धेशीय संस्था व आदर्श मेडिकल रक्तपेढीच्यावतीने जागतिक परिचारिका दिनाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर मेडिकलच्या मेट्रन मालती डोंगरे, इंद्रधनुष बहुउद्धेशीय संस्थेचे सचिव स्नेहल गुर्वे, उपअधीक्षक डॉ. पाचपोर आदी उपस्थित होते.

डोंगरे म्हणाल्या, परिचारिका रुग्णांचा जखमेवर मलम लावण्यासोबतच त्यांच्या मनावरच्या घावावर फुंकरही घालतात. ही बांधीलकी आणि नि:स्वार्थ कठोर परिश्रम करीत असताना आपल्या घरासाठी त्या वेळ काढतात. आपल्या मुलांना घडविण्यासाठी तेवढेच परिश्रम घेतात. संचालन शुभांगी बर्डे यांनी तर आभार गुर्वे यांनी मानले. परिचारिका हेमलता मेश्राम व चमूने स्वागत गीत सादर केले. 

परिचारिकांनी केले रक्तदान
रक्तदान शिबिरात सर्व परिचारिकांनी रक्तदान करण्यासाठी पुढाकार घेतला. यात ब्रदर्सची संख्याही मोठी होती.  काही परिचारिकांनी डयुटी संपल्यावर रक्तदान केले. तर काहींनी ड्युटीवर जाण्यापूर्वी रक्तदान करीत एक आदर्श ठेवला. मेडिकलच्या रक्तपेढीचे डॉक्टर व कर्मचाºयांनी या रक्तदान शिबिरात सहकार्य के ले.

Web Title: Salute to the dedication of nurses who provide patient care-Dr. Avinash Gawande

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर