नागपुरात तिरळे कुणबी समाजाला मुख्यमंत्र्यांनी दिले समाजभवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 10:05 PM2018-12-01T22:05:37+5:302018-12-01T22:07:24+5:30
तिरळे कुणबी समाजाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोलाचे गिफ्ट दिले आहे. नागपूर सुधार प्रन्यासच्या बिडीपेठ येथील जागेवर उभारण्यात आलेला टाऊन हॉल तिरळे कुणबी सेवा मंडळाला देण्याचा आदेश नगर विकास विभागाकडून जारी करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तिरळे कुणबी समाजाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोलाचे गिफ्ट दिले आहे. नागपूर सुधार प्रन्यासच्या बिडीपेठ येथील जागेवर उभारण्यात आलेला टाऊन हॉल तिरळे कुणबी सेवा मंडळाला देण्याचा आदेश नगर विकास विभागाकडून जारी करण्यात आला आहे.
तिरळे कुणबी सेवा मंडळाचे अध्यक्ष रमेश चोपडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, नागपूर शहर व जिल्ह्यात कुणबी समाज आठलाखांवर असून यात तिरळे कुणबी समाज साडेचार लाखांवर आहे. एवढी मोठी संख्या असूनही समाजाला हक्काचे समाजभवन नव्हते. गेली अनेक वर्षे शासन स्तरावर पाठपुरावा करूनही सरकारकडून दिलासा मिळाला नाही. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंडळाने प्रस्ताव सादर करताच दखल घेतली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासाठी सकारात्मक भूमिका घेतली. आ. सुधाकर देशमुख व आ. सुधाकर कोहळे यांनी शासनस्तरावर पाठपुरावा केला. शेवटी मुख्यमंत्री फडणवीस यांनी समाजभवन देण्याचा निर्णय घेत शब्द पाळला. ३० नोव्हेंबर रोजी शासकीय आदेश जारी करीत तिरळे कुणबी समाजाला न्याय दिला, अशी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली. कुणबी समाजातील सर्व शाखांसह सामान्य नागरिकांनाही सामाजिक, सांस्कृितक, शैक्षणिक सोहळ्यांसाठी समाजभवन उपलब्ध करून दिले जाईल, असेही चोपडे यांनी स्पष्ट केले.
मंडळाचे सचिव विनोद बोरकुटे, उपाध्यक्ष रविप्रकाश ढोक, सल्लागार कृष्णाजी बोराटे, नामदेव कोहळे, नानाजी सातपुते, मंदाकिनी कळमकर, कोषाध्यक्ष विश्वनाथ पाटील, संचालक नरेंद्र गोरले, रवी वराडे, शंकर कडू, महादेवराव बोराडे, राजेश ढोक, लक्ष्णमराव राऊत, शिला महल्ले, प्रदीप कदम, संजय डोईफोेडे, अॅड. महेश महल्ले, अॅड. सुरेश काळे, नरेश बरडे, रिता मुळे, अशोक मुळे, विष्णु वाकोडे, सचिन नागमोते, राजु फुटाणे, प्रल्हादराव गावंडे, दिवाकर वाघ, अंबादास वानखेडे, गोविंद अखंड, मधु घाटे आदी या वेळी उपस्थित होते.
असे आहे समाज भवन
- नासुप्रतर्फे बिडीपेठच्या आशीर्वादनगर येथे २०५५.६३४ चौ. मी. (भूखंड क्रमांक ११३२ ) जागेवर टाऊन हॉलचे बांधकाम करण्यात आले आहे.
- संबंधित भवनासाठी मंडळाला २ कोटी ६२ लाख रुपये नासुप्रकडे जमा करायचे आहेत.
- ही रक्म भरताच समाजभवन मंडळाला हस्तांतरित केले जाईल.
- समाजभवन ३० वर्षांच्या लीजवर राहील. पुढे लीज नुतनीकरण करता येईल.
- भवनाच्या सौंदर्यीकरणायासाठी आणखी दीड कोटींचा खर्च अपेक्षित आहे.