समरसता साहित्य संमेलन उद्यापासून; साहित्याचा होणार जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2022 05:48 PM2022-07-01T17:48:48+5:302022-07-01T17:51:47+5:30

या दोन दिवसीय या संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. अक्षयकुमार काळे असून स्वागताध्यक्ष माजी खासदार दत्ता मेघे आहेत.

Samarasata Sahitya Sammelan from 2nd july | समरसता साहित्य संमेलन उद्यापासून; साहित्याचा होणार जागर

समरसता साहित्य संमेलन उद्यापासून; साहित्याचा होणार जागर

Next

नागपूर : समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्राच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य व समरसतेवर आधारित १९ व्या समरसता साहित्य संमेलनाचे उद्घाटन २ जुलै रोजी सकाळी १० वाजता माजी खासदार तरुण विजय यांच्या हस्ते होणार आहे. सिव्हिल लाईन्स स्थित डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य नगरीत होणाऱ्या या दोन दिवसीय या संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. अक्षयकुमार काळे असून स्वागताध्यक्ष माजी खासदार दत्ता मेघे आहेत.

तत्पूर्वी, सकाळी ८ वाजता ग्रंथ दिंडीने संमेलनाला प्रारंभ होईल. त्यानंतर सकाळी ९.३० वाजता ग्रंथप्रदर्शन, समरसता रांगोळी प्रदर्शन आणि चित्र प्रदर्शनाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. सकाळी १० वाजता गुरुदेव सोरदे स्मृती व्यासपीठावर होणाऱ्या उद्घाटन सोहळ्याला सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि माजी संमेलनाध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभूणे, समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. ईश्वर नंदपुरे, डॉ. प्रसन्न पाटील, निमंत्रक सुनील वारे, कार्यवाह डॉ. राजेंद्र नाईकवाडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. संमेलनासाठी नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे ४०० प्रतिनिधींची नोंदणी झालेली आहे.

- साहित्याचा होणार जागर

उद्घाटन सत्रानंतर दुपारी १२ वाजता होणाऱ्या पहिल्या परिसंवादात ‘अण्णा भाऊंच्या साहित्यातील राष्ट्रीयता’ विषयावर अध्यक्ष डॉ. अरविंद देशमुख भाष्य करणार असून डॉ. भास्कर म्हरसाळे, डॉ. कोमल ठाकरे, शिवा कांबळे व डॉ. विजय तुंटे यांचाही सहभाग राहील. दुपारी ३ वाजता वाजता होणाऱ्या परिसंवादाचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. नामदेव कांबळे ‘अण्णा भाऊ साठे : समतेचे पथिक’ विषयावर भाष्य करतील. यात डॉ. धनंजय भिसे, डॉ. अंबादास सकट, डॉ. उज्ज्वला हातागळे व हेमंत चोपडे यांचा सहभाग राहणार आहे. सायंकाळी ५.३० वाजता दुर्गेश सोनार यांच्या अध्यक्षतेत निमंत्रित कवींचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. याशिवाय, दुपारी १ वाजता मुक्त काव्यमंच, सायंकाळी ४ वाजता विषयनिष्ठ भाषणामध्ये ‘समरसतेची चिंतनसूत्रे’ विषयावर विवेक साप्ताहिकाचे सहकार्यकारी संपादक रवींद्र गोळे यांचे भाषण आणि रात्री ८ वाजता होणाऱ्या संगीत रजनीचे आयोजन केले जाणार आहे.

Web Title: Samarasata Sahitya Sammelan from 2nd july

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.