संभाजी भिडे यांना अटक करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 08:55 PM2018-07-04T20:55:40+5:302018-07-04T20:56:56+5:30
भीमा कोरेगाव प्रकरणातील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना अटक करा, या मागणीला घेऊन पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या (पीरिपा) पदाधिकाऱ्यांनी एलआयसी चौकात नारे-निदर्शने केली. विशेष म्हणजे, पोलिसांच्या पत्रकानुसार ‘पीरिपा’चा मोर्चा बुधवारी निघणार होता, परंतु मोर्चा न काढता नारे-निदर्शने करीत आपल्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भीमा कोरेगाव प्रकरणातील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना अटक करा, या मागणीला घेऊन पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या (पीरिपा) पदाधिकाऱ्यांनी एलआयसी चौकात नारे-निदर्शने केली. विशेष म्हणजे, पोलिसांच्या पत्रकानुसार ‘पीरिपा’चा मोर्चा बुधवारी निघणार होता, परंतु मोर्चा न काढता नारे-निदर्शने करीत आपल्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले.
‘पीरिपा’चे राष्ट्रीय अध्यक्ष आ. प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या मार्गदर्शनात उपाध्यक्ष थॉमस कांबळे, नागपूर जिल्हा अध्यक्ष नरेंद्र डोंगरे व शहर अध्यक्ष अरुण गजभिये यांच्या नेतृत्वात बुधवारी दुपारी एलआयसी चौकात नारे-निदर्शने केली. त्यानंतर पार्टीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे जाऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. निवेदनात संभाजी भिडे यांना अटक करा, या मुख्य मागणीसोबतच शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करा, नागपूरच्या पटवर्धन मैदनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी स्मारकाचे त्वरित बांधकाम करा, जीवनावश्यक वस्तू पेट्रोल, डिझेलच्या किमती कमी करा आदी मागण्यांचा समावेश होता. आंदोलनात रंजनाताई कवाडे, कैलास बोंबले, बाळूमामा कोसमकर, भगवानदास भोजवाणी, विजय पाटील, भीमराव गोसावी, विनोद पाटील, मोरेश्वर बागडे आदींचा सहभाग होता.