समृद्धीचे नागपुरातही जाळे

By admin | Published: December 30, 2015 03:16 AM2015-12-30T03:16:48+5:302015-12-30T03:16:48+5:30

फसवणुकीची सप्रमाण माहिती असूनही तपास यंत्रणांकडून संबंधित फायनान्स कंपनीच्या ठगबाजांवर तातडीने कारवाई झाली नाही.

Sambhushti Nagpur too has a network | समृद्धीचे नागपुरातही जाळे

समृद्धीचे नागपुरातही जाळे

Next

गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा फटका : तपास अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा
नरेश डोंगरे नागपूर
फसवणुकीची सप्रमाण माहिती असूनही तपास यंत्रणांकडून संबंधित फायनान्स कंपनीच्या ठगबाजांवर तातडीने कारवाई झाली नाही. त्यामुळे कंपनीच्या ठगबाजांनी गेल्या १० महिन्यात हजारो गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.

‘समृद्ध जीवना’चे आकर्षण दाखवून कंपनीच्या ठगबाजांनी राज्यातील हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा फटका दिला. त्यात नागपूर-विदर्भातीलही सुमारे दोन हजार गुंतवणूकदार असल्याची माहिती आहे. ‘समृद्ध’चे संचालक आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून हजारो गुंतवणूकदारांकडून करोडो रुपये गोळा करीत असल्याची कुणकुण राज्यातील तपास यंत्रणांना लागली. भक्कम पुरावे मिळाल्यानंतर तपास यंत्रणा गेल्या जानेवारी-फेब्रुवारी महिन्यापासून कंपनीच्या जाळ्यात अडकलेल्यांकडून तक्रारी मिळविण्यासाठी कामी लागली. सीआयडीने नागपूरच्या गुन्हे शाखेला दोन हजारांवर गुंतवणूकदारांची माहिती देऊन शहानिशा करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार, गुन्हे शाखेच्या पथकाने अनेकांकडे ‘फोनोफ्रेण्ड’ केले. अनेकांनी आपण रक्कम गुंतवल्याचे मान्य केले. कंपनीचे सध्या चांगले दिवस नसल्याने आमचे पैसे थकीत झाले. मात्र, कंपनीच्या संचालकांशी बोलणी झाली असून आमची रक्कम परत मिळणार असल्याचे सांगून त्यांनी तक्रार देण्यास नकार दिला. त्याचप्रमाणे अनेक गुंतवणूकदारांनी फसवणुकीची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना फोनवरून दिली. रक्कम अडकल्याचेही सांगितले. परंतु पोलिसांनी त्यांना तक्रारीसाठी प्रोत्साहित केले नाही किंवा कारवाईसाठी उत्सुकता दाखविली नाही. गुंतवणूकदारांच्या चौकशीचा अहवाल सीआयडीच्या अधिकाऱ्यांना सोपविण्यात आला. फसवणूक झाल्याचे स्पष्ट होऊनही तपास अधिकाऱ्यांनी तटस्थ भूमिका स्वीकारल्याने नऊ ते दहा महिन्यांत या कंपनीच्या ठगबाजांना आणखी हजारो गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढणे आणि त्यांचे कोट्यवधी रुपये गिळंकृत करणे शक्य झाले.

मालमत्तेची विल्हेवाट

तपास अधिकाऱ्यांनी कंपनीच्या ठगबाजांविरुद्ध तक्रारी दाखल करून घेण्यासाठी का उत्सुकता दाखविली नाही, हा संशय वाढवणारा मुद्दा आहे. त्याची कशा पद्धतीने सरकार दखल घेणार, हा स्वतंत्र चौकशीचा विषय आहे. परंतु तपास अधिकाऱ्यांनी कारवाईसाठी तत्परता दाखविली नाही म्हणून या ठगबाजांनी अनेकांची आयुष्यभराची जमापुंजी हिसकावून घेतली, ही संतापजनक बाब त्यातून अधोरेखित झाली आहे. दुसरे म्हणजे, याचमुळे कंपनीच्या ठगबाजांनी जमविलेल्या कोट्यवधीच्या मालमत्तेची पद्धतशीर विल्हेवाट लावणेही शक्य झाले.

शहानिशा करण्याच्या सूचना

यासंदर्भात गुन्हे शाखेच्या उपायुक्त दीपाली मासिरकर यांच्याकडे विचारणा केली असता, समृद्ध जीवनविरुद्ध ‘सीआयडीकडे एफआयआर दाखल झाला होता’. आम्हाला सुमारे दोन हजार गुंतवणूकदारांची यादी मिळाली होती. त्याआधारे आम्ही अनेकांकडे चौकशी केली. त्यातील काहींनी आमचे सेटलमेंट होणार आहे, असे सांगितले, तर काहींनी आमची फसवणूक झाल्याचे फोनवर सांगितले होते. प्रत्यक्षात मात्र कुणी आमच्याकडे तक्रार दिली नाही, असे त्या म्हणाल्या.

Web Title: Sambhushti Nagpur too has a network

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.