उपराजधानीत संततधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2016 02:59 AM2016-07-09T02:59:16+5:302016-07-09T02:59:16+5:30

गुरुवारी रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने उपराजधानी ओलिचिंब झाली आहे. यात शहरातील काही सखल भागात पाणी भरले,जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Sampraday Santhandhar | उपराजधानीत संततधार

उपराजधानीत संततधार

Next

जनजीवन विस्कळीत : नागपुरात २१.६ मिमी. पाऊस
नागपूर : गुरुवारी रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने उपराजधानी ओलिचिंब झाली आहे. यात शहरातील काही सखल भागात पाणी भरले,जनजीवन विस्कळीत झाले आहे. मागील २४ तासांपासून शहरात अखंड रिपरिप सुरू असून शुक्रवारी रात्री ८.३० वाजतापर्यंत २१.६ मिमी. पावसाची नोंद झाली आहे.
विशेष म्हणजे, या पावसाने शहरातील जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले असले, तरी त्याचा शेतकऱ्यांच्या पिकाला मात्र प्रचंड फायदा झाला आहे. कृषी विभागाच्या कागदावर आतापर्यंत जिल्ह्यात केवळ ५१.२१ टक्केच पेरण्या आटोपल्या असल्या, तरी प्रत्यक्षात मात्र ९५ टक्क्यांपेक्षा अधिक पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. उपलब्ध आकडेवारीनुसार आतापर्यंत जिल्ह्यात एकूण २७५ मिमी. पाऊस पडला आहे. शिवाय ८ जुलै रोजी एका दिवसांत जिल्ह्यात २४.२५ मिमी. पाऊस झाला आहे. सरासरी ८ जुलैपर्यंत जिल्ह्यात २६२.८७ मिमी. पाऊस पडतो. त्या तुलनेत यंदा २७५.०९ मिमी. पाऊस झाला आहे. याशिवाय प्रत्येक महिन्यातील पावसाची सरासरी पाहता जूनमध्ये १७३.४४ मिमी, जुलैमध्ये ३४६.५४, आॅगस्ट २७४.४४, सप्टेंबरमध्ये १९४.१८ व आॅक्टोबरमध्ये ४८.८६ मिमी. पाऊस पडतो. तसेच १ जून ते ३१ मे या काळात जिल्ह्यात सरासरी ११३८.८६ मिमी. पाऊस पडत असून १ जून ते ३१ आॅक्टोबर दरम्यान १०३७.४५ मिमी. पावसाची सरासरी असते. यंदा जून महिन्यात पावसाने दडी मारली होती. मात्र जुलै महिना सुरू होताच दमदार पावसाची एन्ट्री झाली आहे. एवढेच नव्हे, तर जून महिन्यातील अनुशेषसुद्धा भरून निघालेला दिसून येत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Sampraday Santhandhar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.