मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा; 'त्या' बसबाहेर आयुषला जिवंत पाहून मिठीच मारली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2023 03:41 PM2023-07-01T15:41:07+5:302023-07-01T15:44:35+5:30

समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसला झालेल्या भीषण दुर्घटनेत २५ जणांचा मृत्यू झाला आहे.

Samruddhi Mahamarg Bus Accident A friend is like dew in a wildfire; After seeing Ayush alive in the middle of the night, she hugged him | मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा; 'त्या' बसबाहेर आयुषला जिवंत पाहून मिठीच मारली

मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा; 'त्या' बसबाहेर आयुषला जिवंत पाहून मिठीच मारली

googlenewsNext

नागपूर - मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा... या कवितेच्या ओळी मित्राचं आणि मैत्रीचं महत्त्व पटवून देणाऱ्या आहेत. समृद्धी महामार्गावरनागपूर-पुणे विदर्भ ट्रॅव्हल्सला झालेल्या भीषण अपघातानंतर आयुषचे मित्र काही मिनिटांतच त्याच्याजवळ पोहोचले आणि या मित्रांची साथ त्याला वरील कवितेतील ओळींप्रमाणेच वाटली. कारण, बसला लागलेल्या आगीत सर्वकाही जळालं होतं, भीषण स्फोटात जवळपास २५ जणांचा मृत्यू झाला होता. पण, आपल्यासोबत पुण्याला फिरायला निघालेला आयुष सुदैवाने बचावल्याचा पाहून मित्रांना अत्यानंद झाला. मागील ट्रॅव्हल्समधून अपघातस्थळी उतरताच आयुषचे मित्र, आयुष .. आयुष... ओरडत होते. त्यावेळी, आयुषने हात उंचावत मित्रांना जवळ केलं आणि सर्वांनीच एकमकेांना जादू की झप्पी दिली. 

समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसला झालेल्या भीषण दुर्घटनेत २५ जणांचा मृत्यू झाला आहे. हा भीषण अपघात सिंदखेड राजा नजीक पिंपळखुटा फाट्याजवळ पहाटे दीड वाजेच्या सुमारास घडला. नागपूरहून-पुण्याला जाणाऱ्या या बसचा टायर फुटल्यानं बस दुभाजक व खांबाला धडकली आणि डिझेल टाकी फुटल्यामुळे बसने पेट घेतला. या आगीत होरपळून बसमधील २५ प्रवाशांचा मृत्यू झाला. मात्र, देव तारी त्याला कोण मारी, असं म्हणतात ती म्हणत आयुष घाडगे या तरुणासाठी खरी ठरली. बसमधील सर्वात शेटवच्या म्हणजेच ३० नंबर सीटवरुन प्रवास करणारा आयुष वाचला आणि त्याच्या मित्रांना आनंद झाला. 

आम्ही अपघातस्थळी पोहोचल्यावर ते पाहून आम्हाला काहीच सुचलं नाही. कारण, ते सगळं भयावह होतं. गाडीतून बाहेर निघल्याबरोबर आम्ही फक्त आमच्या मित्राला शोधत नाही, बाकी काहीचं नव्हत, आम्हाला फक्त आयुष कुठंय तू... आयुष घाडगे.. असं आम्ही ओरडत होतो. मग, आयुषनेच आम्हाला हात केला, त्याला पाहून समाधान मिळालं, असं आयुषच्या एका मित्राने सांगितले. तर, आयुषला जिवंत पाहून मिठी मारायची इच्छा झाली, कारण सर्व मृत्यू झालेले होते. ते दृश्य बघून रडू येत होतं. पण आयुषला जिवंत पाहून आनंद झाला. मग लगेच आम्ही आयुषला आमच्या ट्रॅव्हल्समध्ये बसवलं आणि आम्ही संभाजीनगरकडे निघालो, अशी आपबिती आणि मित्र बचावल्याचा आनंद आयुषच्या मित्रांनी कथन केला. जे मित्र मागील ट्रॅव्हल्समधून पुण्याला फिरायला जात होते. 

पुण्याला फिरायला जायचा होता प्लॅन

आयुष आणि त्याच्या मित्रांनी पुण्याला फिरायला जायचा प्लॅन केला होता. त्यासाठी, नागपूरच्या बुटी बोरीवरुन ते सर्व मित्र सोबतच निघणार होतो. मात्र, ऐनवेळी प्लॅन चेंज झाला आणि आयुष एकटाच बुटी बोरीवरुन निघाला. त्याचे इतर तीन मित्र वणीवरुन दुसऱ्या ट्रॅव्हल्सने बसले. ते सर्वजण पुण्याला फिरायला जाणार होते. पण, विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसमधून प्रवास करणारा आयुष साखरझोपेत असताना त्याझ्या अंगावर काहीतरी पडल्याचं त्याला जाणवलं. त्यामुळे, त्याला जाग आली. त्यावेळी, अंगावर २-३ जण पडले होते. बसमध्ये आग लागली होती आणि अपघात झाल्याची जाणीव आयुषला तेव्हा झाली. मी शेवटच्या सीटवर असल्याने शेजारील काच फोडून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. त्यात मला यश आलं. माझ्यासोबत आणखी दोघांना आम्ही बसमधून बाहेर काढलं, असा थरारक प्रसंग आयुषने सांगितला. त्यानंतर, काही वेळातच त्याचे मित्र घटनास्थळी पोहोचले. 

Web Title: Samruddhi Mahamarg Bus Accident A friend is like dew in a wildfire; After seeing Ayush alive in the middle of the night, she hugged him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.