शैक्षणिक शुल्क माफ करण्यासाठी मार्ड आंदोलनाच्या पावित्र्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:10 AM2021-09-22T04:10:54+5:302021-09-22T04:10:54+5:30
नागपूर : कोरोनाकाळात सेवा देणाऱ्या निवासी डॉक्टरांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले होते. परंतु, या आश्वासनाची ...
नागपूर : कोरोनाकाळात सेवा देणाऱ्या निवासी डॉक्टरांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले होते. परंतु, या आश्वासनाची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे, निवासी डॉक्टरांची संघटना सेंट्रल मार्डने संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
या संदर्भात सेंट्रल मार्डच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीचे आयोजन करून, आंदोलनाची रुपरेखा तयार केली आहे. या संदर्भात सेंट्रल मार्डने जारी केलेल्या वक्तव्यात, कोरोनाकाळात निवासी डॉक्टरांनी रुग्णांची सेवा केली. त्यात त्यांचे शैक्षणिक नुकसान झाले असल्याचे म्हटले आहे. त्यावेळी आरोग्य शिक्षण मंत्र्यांनी शैक्षणिक शुल्क माफ करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, कोरोना संक्रमण ओसरताच, राज्य सरकारला आपल्या आश्वासनांचा विसर पडलेला आहे. त्याअनुषंगाने राज्य सरकारला स्मरण पत्र देण्यात आले असून, पुढच्या आठवड्यात राज्यस्तरीय आंदोलन उभारल्या जाईल, असे सेंट्रल मार्डने म्हटले आहे.
..............