नागपुरात रेती तस्करांना दणका : चार टिप्पर पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 08:50 PM2020-06-19T20:50:26+5:302020-06-19T20:52:16+5:30

रेती तस्करी करणाऱ्या चार वाहनांना पकडून पोलिसांनी रेती माफियांना दणका दिला आहे. पकडलेल्या ट्रकमध्ये लाखोंची रेती आहे. नागपूर शहर आणि जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून रोज करोडोंच्या रेतीची तस्करी करून रेती माफिया बिनबोभाट ती विकत आहे. यातून रेती माफिया सरकारला दरवर्षी शेकडो कोटी रुपयांचा फटका देतात.

Sand smugglar hammered in Nagpur : four tippers saised | नागपुरात रेती तस्करांना दणका : चार टिप्पर पकडले

नागपुरात रेती तस्करांना दणका : चार टिप्पर पकडले

Next
ठळक मुद्देलाखोंची रेती जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेती तस्करी करणाऱ्या चार वाहनांना पकडून पोलिसांनी रेती माफियांना दणका दिला आहे. पकडलेल्या ट्रकमध्ये लाखोंची रेती आहे.
नागपूर शहर आणि जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून रोज करोडोंच्या रेतीची तस्करी करून रेती माफिया बिनबोभाट ती विकत आहे. यातून रेती माफिया सरकारला दरवर्षी शेकडो कोटी रुपयांचा फटका देतात. रेती माफियांच्या दावणीला महसूल तसेच पोलीस विभागातील काही भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचारी असल्यामुळे रेती माफियांचे चांगलेच फावते. ही बाब लक्षात घेऊन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १५ जूनला एक बैठक घेतली. नागपूर जिल्हा आणि शहरात सुरू असलेल्या रेती तस्करीला आळा घालण्याचे निर्देश दिले. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी त्याची लगेच दखल घेत शहरातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना रेती माफियांना तातडीने चाप बसविण्याचे आदेश दिले. या पार्श्वभूमीवर परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त नीलोत्पल यांच्या विशेष पथकाने गुरुवारी रात्री भंडारावरून रामटेक मार्गे नागपूर येणारे रेतीने भरलेले चार ट्रक उप्पलवाडी पुलाजवळ अडविले. पोलिसांनी ट्रक चालक राजेश उरकुडा सिंगनजुडे, प्रवीण रमेश संतापे, कृष्­णा गंगाराम सोनवणे आणि महादेव गोपीचंद डोंगरवार यांच्याकडे चौकशी केली. त्यांनी ही रेती भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथून आणल्याचे सांगितले मात्र पोलिसांच्या अनेक प्रश्नावर त्यांनी उत्तर देण्याचे टाळले. ते उडवाउडवीची उत्तरे देत असल्यामुळे पोलिसांनी महसूल विभागाच्या तहसीलदाराला बोलवून हे चारही ट्रक त्यांच्या स्वाधीन केले.

रॉयल्टीच नाही
लाखोंची रेती एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात आणणाऱ्या या चारपैकी कोणत्याच ट्रक चालकाकडे आवश्यक असलेली रॉयल्टी नव्हती. त्यामुळे त्यांनी नागपूरपर्यंत ट्रक कसे काय आणले, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पुढच्यावर कारवाई, मागचे गायब
नागपूर शहरात चोरीची रेती घेऊन येणाऱ्या रेती माफियांचे मोठे नेटवर्क आहे. या नेटवर्कमध्ये १०० वर दलाल काम करतात. रोज रात्री नागपुरात १०० पेक्षा जास्त ट्रक रेती घेऊन येतात. प्रत्येक ट्रकमध्ये किमान एक किलोमीटरचे अंतर असते. चार किंवा पाच ट्रक पुढे असतात. त्यांच्यापासून सुमारे एक ते दोन किलोमीटर अंतरावर दुसऱ्या ट्रकची रांग असते. या ट्रकच्या पुढे आणि मागे रेती माफियांच्या नेटवर्कमधील दलाल दुचाकीने चालतात. पोलिसांची नाकेबंदी असल्यास ते लगेच फोन करून ट्रक चालकांना माहिती देतात. पोलिसांनी ट्रक अडविले की मागचे सर्व ट्रकचालक सतर्क होतात. त्यामुळे पोलिसांना एका वेळी फार तर चार-पाच किंवा दहा ट्रक कारवाईसाठी मिळतात. योजनाबद्ध पद्धतीने दहा-पंधरा किलोमीटरच्या परिसरात पोलिसांनी सापळा लावून कारवाई केल्यास एकाच रात्रीतून किमान ५० ते १०० ट्रक पोलिसांच्या हाती लागू शकतात.

Web Title: Sand smugglar hammered in Nagpur : four tippers saised

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.