रेती वाहतुकीचा ट्रॅक्टर जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:41 AM2021-02-05T04:41:43+5:302021-02-05T04:41:43+5:30
पाटणसावंगी : सावनेर पाेलिसांनी पाटणसावंगी येथील पाेळा मैदान परिसरात कारवाई करीत रेतीची विना राॅयल्टी वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला. त्यात ...
पाटणसावंगी : सावनेर पाेलिसांनी पाटणसावंगी येथील पाेळा मैदान परिसरात कारवाई करीत रेतीची विना राॅयल्टी वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला. त्यात ट्रॅक्टर चालकास अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून एकूण १ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरुवारी (दि. २८) सकाळी ८.१५ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
रवी श्रावण चापले (३०, रा. पाटणसावंगी, ता. सावनेर) असे अटक करण्यात आलेल्या ट्रॅक्टरचालकाचे नाव आहे. पाटणसावंगी परिसरातून रेतीची वाहतूक केली जात असल्याची माहिती पाटणसावंगी पाेलीस चाैकीतील पाेलीस कर्मचाऱ्यांना मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी परिसराची पाहणी केली. यात त्यांना गावाजवळच्या पाेळा मैदान परिसरात विना क्रमांकाचा ट्रॅक्टर दिसला. पाेलिसांनी ट्रॅक्टर थांबवून झडती घेतली असता, त्यात रेती आढळून आली. ती रेतीची विना राॅयल्टी वाहतूक असल्याचे कागदपत्रांच्या तपासणीअंती स्पष्ट हाेताच पाेलिसांनी चालकास अटक केली आणि ट्रॅक्टर व रेती जप्त केली. या कारवाईमध्ये १ लाख ४६ हजार रुपयांचा ट्रॅक्टर आणि चार हजार रुपये किमतीची एक ब्रास रेती असा एकूण १ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती पाेलिसांनी दिली. याप्रकरणी सावनेर पाेलिसांनी भादंवि ३७९ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास पाेलीस हवालदार कृष्णा जुनघरे करीत आहेत.