रेतीच्या ट्रकने चौघांना चिरडले

By admin | Published: March 31, 2016 03:14 AM2016-03-31T03:14:21+5:302016-03-31T03:14:21+5:30

सर्व्हिस रोडने राँग साईडने रेती भरून येणाऱ्या भरधाव ट्रकने चौघांना उडविले. त्यात घटनास्थळीच आजीसह तीन नातवंडांचा मृत्यू झाला.

The sand truck crushed all four | रेतीच्या ट्रकने चौघांना चिरडले

रेतीच्या ट्रकने चौघांना चिरडले

Next

कामठी : सर्व्हिस रोडने राँग साईडने रेती भरून येणाऱ्या भरधाव ट्रकने चौघांना उडविले. त्यात घटनास्थळीच आजीसह तीन नातवंडांचा मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास नागपूर - जबलपूर मार्गावरील नेरी गावालगत झाला. या अपघातामुळे संतापलेल्या नागरिकांनी ट्रकचालकाला झाडाला बांधून ठेवले. त्यानंतर पोलिसांच्या स्वाधीन केले. या अपघातामुळे साठे कुटुंबावर शोककळा पसरली.देवलबाई रणछोडदास साठे (६०), काजल रण्णू साठे (७), रामू रण्णू साठे (३) आणि जया रण्णू साठे (१) सर्व रा. जुनापाणी, ता. हिंगणा अशी मृत आजी - नातवंडांची नावे आहेत. आरोपी ट्रकचालकाचे नाव अशोक उत्तम शेंडे (२९, रा. माहुली, ता. पारशिवनी) असे आहे. तो एमएच-३१/डब्ल्यू-३४९२ क्रमांकाच्या ट्रकमध्ये नेरी रेतीघाटातून रेती भरून कामठीकडे येत होता. त्याचवेळी नागपूर-जबलपूर बाह्यवळण मार्गाला जोडणाऱ्या सर्व्हिस रोडलगत असलेल्या शेतात मोरझरी, जुनापाणी (ता. हिंगणा) येथील काठियावाडी गुराख्यांचा डेरा मार्गस्थ होण्याच्या तयारीत होता. सर्व गुराखी हे गाई-गुरांसह रवाना झाले होते. तर महिला या छोट्या मुलांना घेऊन निघण्याच्या तयारीत होत्या. तेवढ्यात शॉर्टकटच्या नादात सर्व्हिस रोडच्या राँग साईडने आरोपीने भरधाव ट्रक आणला. भरधाव ट्रकचालकाला अचानक समोरून मोटरसायकलवर एक तरुण येत असल्याचे दिसताच त्याने मोटरसायकलस्वाराला वाचविण्यासाठी ट्रक बाजूला करण्याचा प्रयत्न केला. मात्र ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा ट्रक महिला-मुले असलेल्या शेतात गेला. तेथे वृद्ध महिलेसह तीन मुलींना धडक दिली.

ट्रकचालकाला झाडाला बांधले
नागपूर : भीषण धडकेत गंभीर जखमी होऊन चौघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. या अपघाताबाबत समजताच काठियावाडी घटनास्थळी धावत आले आणि त्यांनी ट्रकचालकाला झाडाला बांधून ठेवले.
तसेच त्याला मारहाण केली. त्यानंतर पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून जमावाच्या तावडीतून आरोपीला सोडवून ताब्यात घेतले. या अपघातप्रकरणी आरोपी ट्रकचालकाविरुद्ध भादंविच्या कलम २७९, ३०४ (अ), १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संतोष ढेमरे करीत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The sand truck crushed all four

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.