तुकाराम मुंढे यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप, पोलिसात तक्रार दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 06:36 PM2020-06-22T18:36:38+5:302020-06-22T18:50:48+5:30

कोविड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळापासून सुरू असलेले लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांच्यातला वाद आता कायद्याच्या कक्षेत आणण्यात आला आहे.

Sandeep Joshi files complaint against Tukaram Mundhe | तुकाराम मुंढे यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप, पोलिसात तक्रार दाखल

तुकाराम मुंढे यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप, पोलिसात तक्रार दाखल

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: कोविड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळापासून सुरू असलेले लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांच्यातला वाद आता कायद्याच्या कक्षेत आणण्यात आला आहे. महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात महापौर संदीप जोशी यांनी सोमवारी दुपारी सदर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. स्मार्ट सिटी प्रकरणात अनियमितात व भ्रष्टाचार केल्याच्या संदर्भात जोशी यांची तक्रार असून त्यांनी मुंढे यांच्यासह तीन अधिकाऱ्यांनाही यात समाविष्ट केले आहे.
हा तक्रार अर्ज सदर पोलिसांनी पुढील कारवाईसाठी पोलीस आयुक्तांकडे पाठवला असून त्यावर काय कारवाई करायची याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे.
२० जून रोजी आयोजित केलेल्या मनपाच्या सर्वसाधारण सभेतून आयुक्त मुंढे नाराज होऊन बाहेर पडले होते. त्यावर संदीप जोशी यांनी, नाराज होऊ नका, परत या अशा आशयाचे एक पत्रही त्यांना दिले होते. मनपाची ही अर्धवट राहिलेली सभा २३ जून रोजी आयोजित केलीे असल्याचेही या पत्रात नमूद होते.

Web Title: Sandeep Joshi files complaint against Tukaram Mundhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.