तृतीय वर्ष वर्गातील संघ स्वयंसेवकांचे नागपुरात पथसंचलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 12:20 AM2018-05-29T00:20:59+5:302018-05-29T00:21:20+5:30

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गातील सातशेहून अधिक स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध पथसंचलन केले. स्वयंसेवकांचे पथसंचनल पाहण्यासाठी रेशीमबाग व सक्करदरा परिसरात नागरिकांची गर्दी झाली होती.

Sangh volunteers of Third-year class parade in Nagpur | तृतीय वर्ष वर्गातील संघ स्वयंसेवकांचे नागपुरात पथसंचलन

तृतीय वर्ष वर्गातील संघ स्वयंसेवकांचे नागपुरात पथसंचलन

googlenewsNext
ठळक मुद्देस्वयंसेवकांचे पथसंचनल पाहण्यासाठी रेशीमबाग व सक्करदरा परिसरात नागरिकांची गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा तृतीय वर्ष शिक्षा वर्ग रेशीमबाग येथे सुरू आहे. २५ दिवस चालणाऱ्या या वर्गामध्ये संपूर्ण भारतातून स्वयंसेवक आलेले आहेत. या स्वयंसेवकांच्या पथसंचलनाला सोमवारी सायंकाळी ६.३० वाजता डॉ.हेडगेवार स्मारक समिती, रेशीमबाग येथून सुरुवात झाली. त्यानंतर व्हॉलिबॉल मैदान, सक्करदरा चौक, भांडे प्लॉट चौक, मंगलमूर्ती चौक, संगम टाकीज चौक, गजानन चौक या मार्गाने शिस्तबद्ध पथसंचलन झाले. संघाचे सहसरकार्यवाह मुकुंद सी.आर., वर्गाचे सर्वाधिकारी अ‍ॅड.गजेंद्रसिंह, महानगर सहसंघचालक श्रीधर गाडगे, अयोध्या भाग संघचालक मनोहरराव सपकाळ, रामभाऊ म्हाळगीनगर संघचालक शिशिर गोस्वामी यांनी भांडे प्लॉट चौकात पथसंचलनाचे अवलोकन केले.

Web Title: Sangh volunteers of Third-year class parade in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.