दहाही झोनमध्ये स्वच्छता जनजागृती रॅली ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:09 AM2020-12-06T04:09:15+5:302020-12-06T04:09:15+5:30

स्वच्छतेत पहिल्या दहा शहरात आणण्यासाठी प्रयत्न लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत देशभरातील स्वच्छ शहराच्या ...

Sanitation Awareness Rally in Ten Zones () | दहाही झोनमध्ये स्वच्छता जनजागृती रॅली ()

दहाही झोनमध्ये स्वच्छता जनजागृती रॅली ()

Next

स्वच्छतेत पहिल्या दहा शहरात आणण्यासाठी प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत देशभरातील स्वच्छ शहराच्या यादीत पहिल्या दहा क्रमांकात नागपूर शहराचा क्रमांक यावा, यासाठी महापालिका प्रशासन कामाला लागले आहे. आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या आवाहनानुसार शनिवारी मनपाच्या सर्व दहा झोनध्ये स्वच्छता रॅली काढून जनजागृती करण्यात आली.

आधी ५८ व्या क्रमांकावर असलेल्या नागपूर शहराने मागील वर्षी भरारी घेत १८ वा क्रमांक गाठला. या वर्षी पाहिल्या दहामध्ये आणण्याचा संकल्प केला आहे. यासाठी झोनचे सहायक आयुक्त, आरोग्य अधिकारी आणि स्वछतादूत कामाला लागले आहेत.

शनिवारी सर्व स्वच्छता अधिकारी, कर्मचाऱ्यांनी झोनमध्ये स्वच्छता जनजागृती रॅली काढली. गांधीबाग झोनमधे पथनाट्य सादर करण्यात आले. नागरिकांना ओला-सुका कचरा वेगवेगळा देण्यासाठी आवाहन करण्यात आले. स्वच्छतेच्या क्रमवारीमध्ये पहिल्या दहा शहरात आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. सर्वात मोठी जबाबदारी सफाई कामगारांची आहे, कारण फील्डवर ते काम करतात. त्यांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले व नागरिकांनी प्रतिसाद दिला तर नागपूर पहिल्या दहा क्रमांकात येऊ शकते, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला.

...

ग्रीन व्हिजिलचा सहभाग

नागपूर महापालिकेसोबत खांद्याला खांदा लावून स्वच्छता अभियानात दरवर्षी जनजागृती करणाऱ्या ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनने धरमपेठ झोनअंतर्गत काढण्यात आलेल्या रॅलीत सहभाग घेऊन जनजागृती केली.

Web Title: Sanitation Awareness Rally in Ten Zones ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.