अंबाझरी जैवविविधता उद्यानात स्वच्छता अभियान ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:07 AM2021-06-28T04:07:05+5:302021-06-28T04:07:05+5:30
नागपूर : वन विभागाचे अधिकारी यांच्या पुढाकाराने किल्लेदार प्रतिष्ठान व आम्ही मराठी वाद्य पथक यांच्यावतीने तरुण पर्यावरणप्रेमींनी रविवारी अंबाझरी ...
नागपूर : वन विभागाचे अधिकारी यांच्या पुढाकाराने किल्लेदार प्रतिष्ठान व आम्ही मराठी वाद्य पथक यांच्यावतीने तरुण पर्यावरणप्रेमींनी रविवारी अंबाझरी जैवविविधता उद्यानात स्वच्छता अभियान राबविले. यावेळी कार्यकर्त्यांनी माेठ्या प्रमाणात प्लास्टिकसह २१ पाेती कचरा उद्यानाबाहेर काढला.
एमआयडीसीकडून वाहत येणाऱ्या नागनाल्याद्वारे माेठ्या प्रमाणात कचरा वाहत येताे. या कचऱ्यासाेबत प्लास्टिकही वाहत येते. प्लास्टिक कचऱ्याचा ढीग जमा हाेऊन पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण हाेताे. हे वाहते पाणी पुढे अंबाझरी तलावात मिळते. या प्रवाहासाेबत वाहत जाणाऱ्या प्लास्टिकमुळे तलावही प्रदूषित हाेत आहे. ही स्थिती पाहता तरुणांनी नाला व तलावाला लागून असलेला परिसर स्वच्छ केला. मानद वन्यजीव रक्षक अजिंक्य भटकर यांच्या पुढाकाराने सहायक वन संरक्षक सुरेंद्र काळे, वन परिक्षेत्र अधिकारी आशिष निनावे, वनपाल प्रवीण बडोले यांच्या मार्गदर्शनात तसेच वनरक्षक आरती भाकरे, नीलेश टवले, विलास खापर्डे, आशिष कोहळे यांच्यासह स्वप्निल बोधाने, दिलीप येवले, नीलेश रामटेके, अनिकेत इंगळे, विशाल देवकर अविनाश पराते, आनंद भंडारी आदींच्या श्रमदानातून हे अभियान राबविण्यात आले.