किल्ला तटबंदी परिसरात स्वच्छता अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:09 AM2021-03-17T04:09:53+5:302021-03-17T04:09:53+5:30
गुमगाव : स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन आणि तरुणांच्या संयुक्त विद्यमाने गुमगाव (ता. हिंगणा) येथील राजे रघुजी भाेसलेकालीन किल्ल्याच्या तटबंदीवर स्वच्छता ...
गुमगाव : स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन आणि तरुणांच्या संयुक्त विद्यमाने गुमगाव (ता. हिंगणा) येथील राजे रघुजी भाेसलेकालीन किल्ल्याच्या तटबंदीवर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी तरुणांनी ‘सेव्ह गुमगाव फाेर्ट’चा संकल्प करीत संदेश दिला.
या ऐतिहासिक किल्ल्याच्या आवार व परिसरात माेठ्या प्रमाणात कचरा साचला हाेता. वाळलेल्या कचऱ्यामुळे आगी लागण्याची शक्यता असल्याने स्थानिक तरुणांनी स्वच्छता अभियान राबवित किल्ल्याचा संपूर्ण परिसर साफ केला. शिवाय, या भागात कुणीही घरातील कचरा, शिळे व उरलेले अन्न व खाद्यपदार्थ तसेच इतर टाकाऊ वस्तू फेकू अथवा टाकू नये, असे आवाहनही तरुणांनी केले. या अभियानात उपसरपंच नितीन बोडणे, अरविंद वाळके, गणपत सोनकुसळे, रवींद्र कुंभारे, प्रशांत सोनकुसळे, जितेंद्र ठनगन, प्रवीण इंगळे, सूर्यकांत कावळे, महेंद्र राऊत, राहुल भाजीपाले, संकेत गावंडे, सुनील शेंदरे, अल्पेश चौधरी, गौरव सोनवाणे, अमोल डडमल, महेश धुर्वे, रितिक शेंडे, सावंत सराटे, कुंदन अवथरे, रोशन नेव्हारे, पंचू धुर्वा, भोजराज लांजे, अशोक हुलके, सहादेव उघडे, शामराव भिरंगे, लक्ष्मण कापसे यांच्यासह तरुणांनी सहकार्य केले.