संजय ढोबळे यांचा अनोखा विक्रम : वर्षभरात मिळाले १९ पेटंट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 11:05 PM2019-12-10T23:05:52+5:302019-12-10T23:07:31+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्रोफेसर डॉ.संजय जानराव ढोबळे यांच्या नावे एक अ़नोखा विक्रम नोंदविल्या गेला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्रोफेसर डॉ.संजय जानराव ढोबळे यांच्या नावे एक अ़नोखा विक्रम नोंदविल्या गेला आहे. जगभरात प्रसिद्ध असलेल्या ‘प्रोग्रेस इन मटेरिअल सायन्स’ या ‘जर्नल’मध्ये शोधपत्रिका प्रकाशित झाली आहे. ‘न्यू रिव्हू ऑन द अॅडव्हान्समेंट इन फॉस्फर कनव्हरटेट लाईट इमिटींग डायोड : फॉस्फर सिंन्थेसिस, डिव्हाईस फेब्रिकेशन अॅन्ड कॅरेक्टाईझेशन’ या विषयावर त्यांची संशोधन पत्रिका आहे. विशेष म्हणजे संबंधित ‘जर्नल’चा ‘इम्पॅक्ट फॅक्टर’ हा २३.७२५ इतका आहे.
ढोबळे यांनी २०१९ या एका वर्षात १४ पेटंट प्रकाशित केले आहे. यात त्यांना डॉ.किशोर रेवतकर, डॉ.निरुपमा ढोबळे, डॉ.अभय देशमुख, डॉ.अनुप भट, डॉ. थेजो कल्याणी, डॉ.गोविंद नायर, यातीश परोह, अभितीत कदम, मनोहर मेहरे, चैताली मेहरे, स्वाती जोशी, वैशाली पिंपळे, अखिलेश उगले व डॉ.अर्चना देशपांडे यांचे मौलिक सहकार्य लाभले. याशिवाय ‘जॉन वॅली अॅन्ड सन्स’ द्वारा प्रकाशित होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ‘जर्नल’मध्ये त्यांचे १०० शोधनिबंध प्रकाशित झाले आहे. एकाच आंतरराष्ट्रीय नियतकालिकात शंभरी गाठणारे ते एकमेव संशोधक आहे. डॉ.ढोबळे यांच्या या उपलब्धीसाठी कुलगुरू डॉ.सिध्दीविनायक काणे, प्र-कुलगुरू डॉ.विनायक देशपांडे, कुलसचिव डॉ.नीरज खटी, अधिष्ठाता विज्ञान व तंत्रज्ञान डॉ.जी.एस.खडेकर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.