"संजय राऊत यांनी आपली नौटंकी बंद करावी, खडसे भाजपमध्ये जातील वाटत नाही"
By कमलेश वानखेडे | Published: April 7, 2024 02:11 PM2024-04-07T14:11:24+5:302024-04-07T14:12:21+5:30
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊत यांना सुनावले
कमलेश वानखेडे, नागपूर: उद्धव सेनेचे नेते संजय राऊत यांनी आपल्या नोटंक्या बंद कराव्या. काय बोलावं याच्या मर्यादा ठरवाव्या, एका छोट्या कार्य कर्त्यासारखे वक्तव्य करू नये, अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी राऊत यांना सुनावले. रविवारी सकाळी त्यांनी नागपुरात पत्रकारांशी संवाद साधला.
पटोले बोलताना म्हणाले की, संविधान विरोधी सरकार आहे. त्यासाठी आम्ही सर्वाना एकत्र यावे. सामोपचाराने प्रश्न सोडवू. सांगलीचा प्रश्न उद्या सोडवू. एकनाथ खडसे हे भाजपमध्ये जातील असे मला वाटत नाही. ते स्वाभिमानी नेते आहेत. भाजपने त्यांना वाईट ट्रीटमेंट दिली. भाजपकडे बलाढय स्वयंघोषित विश्व गुरू आहे, मग याला घ्या त्याला घ्या, अस का करावं लागतं आहे.
अजित पवार यांच्याकडून घोटाळ्याचे ७० हजार कोटी घेतले का, आदर्श घोटाळ्याचे पैसे घेतले का, असा सवाल त्यांनी केला. परमात्मा एक सेवक चे धर्मगुरुवर बागेश्वर महाराज वक्तव्य करत आहे. भाजपचे दाखविण्याचे आणि खाण्याचे दात वेगळे आहे, अशी टीका त्यांनी केली.
जुनी पेन्शन लागू करू!
महाराष्ट्रात सरकार आले तर जुनी पेन्शन लागु करू, केंद्रातील निवडणूक असल्याने ते राज्याच्या जाहीरनाम्यात नाही.