संजय श्रीवास‘ चॅम्पियन आॅफ चॅम्पियन’

By Admin | Published: March 27, 2016 02:54 AM2016-03-27T02:54:33+5:302016-03-27T02:54:33+5:30

अनुभवी संजय श्रीवास याने येथे संपलेल्या ‘विदर्भ श्री २०१६’बॉडी बिल्डिंग स्पर्धेत ‘चॅम्पियन आॅफ चॅम्पियन’हा किताब जिंकला.

Sanjay Srinivas 'champion of champion' | संजय श्रीवास‘ चॅम्पियन आॅफ चॅम्पियन’

संजय श्रीवास‘ चॅम्पियन आॅफ चॅम्पियन’

googlenewsNext

नागपूर : अनुभवी संजय श्रीवास याने येथे संपलेल्या ‘विदर्भ श्री २०१६’बॉडी बिल्डिंग स्पर्धेत ‘चॅम्पियन आॅफ चॅम्पियन’हा किताब जिंकला. त्याला ७१ हजार रुपयांचा रोख पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. नागपूरचा अर्नाल्ड फ्रान्सिस हा मोस्ट इम्प्रूव्हड बॉडी बिल्डर ठरला. त्याला २१ हजार रोख तसेच अकोला येथील सुयश जडिये याला बेस्ट पोजरसाठी ११ हजाराचा रोख पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
विदर्भ बॉडी बिल्डर्स अ‍ॅन्ड फिटनेस असोसिएशनने रेशीमबाग मैदानावर या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे नोएडा येथे आयोजित ‘भारत श्री २०१६’ साठी विदर्भ संघ पाठविण्यात येणार आहे.
६०, ६५, ७०, ७५, ८० आणि ८० किलोच्या वरील गटात स्पर्धा घेण्यात आल्या. प्रत्येक गटातील विजेत्याना २१, ११ आणि ७ हजाराचा रोख पुरस्कार देण्यात आला. आ. चैनसुख संचेती आणि राहुल संचेती यांच्याहस्ते पुरस्कार वितरण झाले.
त्याआधी स्पर्धेचे उद्घाटन महापौर प्रवीण दटके यांनी केले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे विशेष अतिथी होते. प्रमुख उपस्थितात खा. अजय संचेती, आ. सुधाकर देशमुख, विदर्भ संघटनेचे सचिव संजय मोरे, स्थायी समिती अध्यक्ष सुधीर राऊत विदर्भ संघटनेचे पदाधिकारी माधव जोशी, नारायण निघोट, सुरेश काळभूत, चंद्रशेखर घुशे, सुदत्ता रामटेके, दीपक गुप्ता, राजेश तोमर, परवेझ खान यांचा समावेश होता.
विदर्भ संघात निवड झालेले खेळाडू असे: राजन हुमणे, संजय श्रीवास, उमेश आवारकर, मुकेश साहू, सुयश जडिये, आफाक खान, आकाश पराते, प्रतीक तेंडुलकर, अर्नाल्ड फ्रान्सिस, हाश्मी चौधरी सर्व नागपूर, दिनेश राजूरकर यवतमाळ, विजय भोयर अमरावती.
स्पर्धेचे अंतिम निकाल : ६० किलो राजन हुमणे, दिनेश राजूरकर, इजाज खान. ६५ किलो संजय श्रीवास, उमेश आवारकर, बेनी पवार. ७० किलो मुकेश शाहू, सुयश जडिये, उमेश भाकरे.७५ किलो आफाक खान, आकाश पराते, मोहम्मद ओवेस, ८० किलो विजय भोयर, प्रतीक तेंडुलकर, नकवी अली, ८० च्या वर अर्नाल्ड फ्रान्सिस, हाश्मी चौधरी, हरिओम यादव.(क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Sanjay Srinivas 'champion of champion'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.