संजय श्रीवास ‘चॅम्पियन आॅफ चॅम्पियन्स’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 12:08 AM2017-11-14T00:08:59+5:302017-11-14T00:09:17+5:30
स्थानिक अनुभवी खेळाडू संजय श्रीवास याने रविवारी येथे संपलेल्या महापौर चषक विदर्भस्तर शरीरसौष्ठव स्पर्धेत ‘चॅम्पियन आॅफ चॅम्पियन्स’चा किताब जिंकला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्थानिक अनुभवी खेळाडू संजय श्रीवास याने रविवारी येथे संपलेल्या महापौर चषक विदर्भस्तर शरीरसौष्ठव स्पर्धेत ‘चॅम्पियन आॅफ चॅम्पियन्स’चा किताब जिंकला. अमरावतीचा सर्वेश साहू ‘बेस्ट पोझर’चा मानकरी ठरला.
नागपूर महानगरपालिका आणि अॅमेच्युअर बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने लकडगंज भागातील कच्छी विसा मैदानावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सलग दुसºया वर्षी झालेल्या आयोजनात हजारो चाहत्यांच्या साक्षीने नामवंत खेळाडूंनी स्वत:च्या बलदंड शरीरयष्टीचे दर्शन घडवित वाहवा मिळविली.
स्पर्धेचे मुख्य पाहुणे केंद्रीय रस्तेविकास मंत्री नितीन गडकरी होते. व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ.कृष्णा खोपडे, कार्यकारी महापौर दीपराज पार्र्डीकर, सत्तापक्षनेते संदीप जोशी, लकडगंज झोन सभापती दीपक वाडीभस्मे, मनपा क्र ीडा समिती सभापती नागेश सहारे, जलप्रदाय सभापती राजेश घोडपागे, इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशन (आयबीबीएफ)चे अध्यक्ष ‘पद्मश्री’ प्रेमचंद डेगरा, कार्यकारी सचिव चेतन पठारे, संयोजक व नगरसेवक नरेंद्र (बाल्या) बोरकर, संयोजन समिती सचिव राजेश तोमर, जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष दीपक यादव, विदर्भ सचिव विश्वनाथ पळसपगार, सचिव अरु ण देशपांडे, विधितज्ज्ञ विक्र म रोटे, यांची उपस्थिती होती.
राष्ट्रीय स्तरावर शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी आवश्यक सर्व सहकार्य करण्याची ग्वाही गडकरी यांनी दिली. आंतरराष्ट्रीय स्तरावर नागपूरचे नाव उंचाविणारी महिला पॉवरलिफ्टर अल्फीया शेख हिचा गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
महापौर चषक शरीरसौष्ठव
स्पर्धेचे निकाल
निकाल: ६० किलोपेक्षा कमी: शेख बाबा नागपूर, अक्षय टिकेकर अमरावती, दिनेश नंदनवार चंद्रपूर, अब्दुल लतिफ अकोला, महेश रहांगडले नागपूर.
६० ते ६५ किलो: सुयोग तरोडे, अभिषेक पवार, मनीष बावरे, अक्षय गणेर, शुभम जवारे. ६५ ते ७० किलो: संजय श्रीवास, दिनेश बारोकर,आफाक खान, मुकेश साहू (सर्व नागपूर), तीर्थानंद कथेरिया काटोल.
७० ते ७५ किलो: किशन तिवारी नागपूर, कमलेश कश्यप चंद्रपूर, चेतन काशीकर अकोला, दीपक पवार बुलडाणा, अंकित राजभोज अकोला. ७५ ते ८० किलो: राज शाहू अमरावती, सुरेंद्र साहू नागपूर, अंकुश धनबहादूर अकोला, इशान पंडित नागपूर, जमीर कुरेशी अकोला. ८० किलोच्यावर: सर्वेश साहू अमरावती, विजय भोयर अमरावती, वैभव मारकटवार अकोला, ओम यादव कामठी, महोम्मद ओवेस दिग्रस. संजय श्रीवास ‘चॅम्पियन आॅफ चॅम्पियन्स’(नागपूर)आणि सर्वेश साहू ‘बेस्ट पोझर’(अमरावती).