महाराष्ट्रातील ‘संजीवनी बुटी’ धाेक्यात; औषधी वनस्पतींच्या १३० प्रजाती नामशेष हाेण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2021 02:45 PM2021-08-09T14:45:57+5:302021-08-09T14:47:42+5:30

Nagpur News राज्यातील औषधी वनस्पतींच्या १३० प्रजाती नामशेष हाेण्याच्या मार्गावर असून त्यांच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र जैवविविधता मंडळाने धडपड सुरू केली आहे.

'Sanjeevani Buti' in Maharashtra is in denger; 130 species of medicinal plants on the verge of extinction | महाराष्ट्रातील ‘संजीवनी बुटी’ धाेक्यात; औषधी वनस्पतींच्या १३० प्रजाती नामशेष हाेण्याच्या मार्गावर

महाराष्ट्रातील ‘संजीवनी बुटी’ धाेक्यात; औषधी वनस्पतींच्या १३० प्रजाती नामशेष हाेण्याच्या मार्गावर

Next
ठळक मुद्देजैवविविधता मंडळाव्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार धाेकाग्रस्त वनस्पतींची जिल्हानिहाय यादी तयार करून पुनर्लागवड करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. हा संवर्धन आराखडा १० वर्षांसाठी म्हणजे २०२० ते २०३० पर्यंत असेल.

निशांत वानखेडे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मुर्च्छित पडलेल्या लक्ष्मणाला वाचविण्यासाठी रामभक्त हनुमानाचे ‘संजीवनी बुटी’ शाेधायला जाण्याचा किस्सा सर्वपरिचित आहे. पुरातन काळापासून असलेले औषधी वनस्पतींचे महत्त्व या कथेतून समजते. त्याबाबत पुन्हा जाणीव निर्माण हाेण्याची परिस्थिती सध्या आली आहे, कारण महाराष्ट्रातील संजीवनी बुटी धाेक्यात आली आहे. हाेय, राज्यातील औषधी वनस्पतींच्या १३० प्रजाती नामशेष हाेण्याच्या मार्गावर असून त्यांच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र जैवविविधता मंडळाने धडपड सुरू केली आहे.

ॲलाेपॅथी व आधुनिक औषधाेपचाराचा प्रसार हाेण्यापूर्वी या औषधी वनस्पती मानवी आराेग्याचा आधार हाेत्या. अगदी पुराणातही अनेक आजारांवर गुणकारी ठरणाऱ्या असंख्य वनस्पतींचा उल्लेख सापडताे. आधुनिक आराेग्य सुविधांचा प्रसार झाला असल्याने आपण ही संजीवनी विसरत चाललाे. डाेंगराळ भागात व आदिवासी क्षेत्रात आजही अनेक आजारांच्या उपचारांसाठी या वनस्पतींचा उपयाेग केला जाताे, हे सत्य आहे. मात्र या ॲलाेपॅथी औषधी तयार करण्यासाठी अशा वनस्पतींच्या अवशेषांचा उपयाेग केला जाताे, हे विसरून चालणार नाही. काळानुसार यातील अनेक प्रजातीच्या वनस्पती लुप्तप्राय हाेत चालल्या आहेत.

पुण्यातील आगरकर इन्स्टिट्यूट या संस्थेच्या मदतीने केलेल्या सर्वेक्षणानुसार जैवविविधता मंडळाने ५५० औषधी वनस्पतींची निवड केली. त्यातील धाेकाग्रस्त ठरलेल्या १३० प्रजातींची जिल्हानिहाय यादी मंडळाने तयार केली आहे. किडनी, यकृत, मधुमेह, हृदयरोग, मेंदूज्वर, त्वचा राेग, साधारण ताप, खाेकला, डायरिया ते कॅन्सरसारखे आजार बरे करण्यात या वनस्पतींचे औषधी महत्त्व आहे. त्यामुळे त्यांच्या संवर्धनासाठी मंडळाने पावले उचलली आहेत.

यादीतील महत्त्वाच्या संजीवनी बुटी

अघाडा, अडुळसा, अमरकंद, अष्टम्याची वेल, भुई आवळा, बहावा, बकुळ, बेहडा, बेल, बिबा, चिकना, दगडी पाळा, दमवेल, दुधाळी, डिकेमाली, धावडा, गाेकुर्णी, गाेखरू, गुळवेल, हरन दाेडी, हंसपडी, हिरडा, इसबगाेल, जमालगाेटा, कडू भाेपळा, कडू कवट, कडू वडवळ, काटवेल, काळी हळद, कंबरमाेडी, कानफाेडी, कानखरी, खंडवेल, केवडा, काेरफड, कुकरबंदा, कुटकी, लाजाळू, लाल आंबाडी, माधवीलता, नागवेल, नखशिखानी, पडवळ, रगतवड, राई आवळा, रानभेंडी, रानमेथी, रानकांदा, सातू, शीलाजित, सुंदरफुल, सुरन, टेंभुर्णी, वावळी, वाघाटी आदी.

 

जैवविविधता मंडळाचे संवर्धन अभियान

- वनविभाग व सामाजिक वणीकरणाच्या हायटेक नर्सरीमध्ये राेप तयार करण्यात येतील.

- ग्राम, तालुका, पंचायत समिती, जिल्हास्तरीय जैवविविधता व्यवस्थापन समितीमार्फत सरकारी व खासगी जागेवर औषधी वनस्पतींची लागवड व संगाेपनाची जबाबदारी.

- वनविभाग, सामाजिक वणीकरण, कृषी विभागासह प्रत्येक विभागाच्या काेषमधून ४० टक्के निधी नामशेष हाेणाऱ्या प्राणी, वनस्पती प्रजातींच्या संवर्धनासाठी राखीव असेल.

Web Title: 'Sanjeevani Buti' in Maharashtra is in denger; 130 species of medicinal plants on the verge of extinction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :medicineऔषधं