केंद्रीय तेली सेवा संघातर्फे संताजी जगनाडे महाराज जयंती ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:26 AM2020-12-13T04:26:38+5:302020-12-13T04:26:38+5:30

प्रतीक्षा मुलांचे खुले निवारा गृहतर्फे दिव्यांग दिन () नागपूर : कोराडी रोड, शंभूनगर येथील महिला व बाल विकास आयुक्त ...

Santaji Jagannade Maharaj Jayanti on behalf of Kendriya Teli Seva Sangha () | केंद्रीय तेली सेवा संघातर्फे संताजी जगनाडे महाराज जयंती ()

केंद्रीय तेली सेवा संघातर्फे संताजी जगनाडे महाराज जयंती ()

Next

प्रतीक्षा मुलांचे खुले निवारा गृहतर्फे दिव्यांग दिन ()

नागपूर : कोराडी रोड, शंभूनगर येथील महिला व बाल विकास आयुक्त यांच्या अंतर्गत संचालित प्रतीक्षा मुलांचे खुले निवारा गृह व एम.जी सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा अध्यक्ष राजीव थोरात , बुलडाणा अर्बन को-ऑप.क्रेडिट सोसायटीच्या व्यवस्थापिका सुरेखा कोल्हे, प्रतीक्षा मुलांचे खुले निवारा गृहचे संचालक दुर्गादास जिचकार, डॉ. शैलेश फुले, माजी नगरसेवक महेंद्र बोरकर, एम. जी सर्व्हिसेसच्या संचालिका मृनमर्या गांगुली, नक्षल पोलीस विभागाचे मारोती जुनघरे,डॉ. अक्षय जुनघरे, सामाजिक कार्यकर्ता रवी चुरागळे, वरिष्ठ पत्रकार जगदीश थापलीवाल, पवार समाजाचे अध्यक्ष विजय पटले उपस्थित होते. यावेळी डॉक्टरांकडून मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच कोविंड या आजारावर कशाप्रकारे स्वतःची काळजी घ्यावी, स्वच्छता राखावी, सॅनिटायझर,मास्क, वापर कसा करावा यावर मार्गदर्शन करण्यात आले. आभार गुंजन गांगुली यांनी मानले. यावेळी अधिक्षिका युगंधरा खुळे, कर्मचारी भारती नारनवरे, पूजा बांधेवार उपस्थित होते.

Web Title: Santaji Jagannade Maharaj Jayanti on behalf of Kendriya Teli Seva Sangha ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.