नागपूरच्या सान्वी, मैथिलीने मारली बालचित्रकार स्पर्धेत बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:08 AM2021-07-15T04:08:06+5:302021-07-15T04:08:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : बालचित्रकारांच्या बसोली ग्रुपने आयोजित केलेल्या ‘उडते रंग, उडत्या आकांक्षा’ या राष्ट्रीय बालचित्र स्पर्धेत नागपूरच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बालचित्रकारांच्या बसोली ग्रुपने आयोजित केलेल्या ‘उडते रंग, उडत्या आकांक्षा’ या राष्ट्रीय बालचित्र स्पर्धेत नागपूरच्या सान्वी इटकेलवार व मैथिली बोकडे या चिमुकल्यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे तर आदी चन्ने व त्रिशा घोरपडे यांना विशेष प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.
या स्पर्धेत ५ ते १६ वयोगटातील ६९४ बालचित्रकार देशभरातून सहभागी झाले होते. ५ ते ९ व १० ते १६ अशा ‘अ’ व ‘ब’ गटात ही स्पर्धा रंगली. स्पर्धेचे परीक्षण जे.जे. स्कूल ऑफ आर्टचे माजी प्राध्यापक प्रसिद्ध चित्रकार श्रीकांत जाधव व जयपूरचे प्रसिद्ध चित्रकार अमित कल्ला यांनी केले. बसोलीचे चंद्रकांत चन्ने यांनी नियोजन केले.
प्रथम क्रमांकाचे विजेते
‘अ’ गट प्रथम - सान्वी इटकेलवार (नागपूर), सिया भोसले (जळगाव), रुहाणी सिंह (बेंगळुरू), रिया देशमुख (पुणे)
‘ब’ गट प्रथम - मैथिली बोकडे (नागपूर), अद्वैत माटे (अंबरनाथ), श्रीया नटराज (मुंबई), वृत्तिका आहुजा (पुणे)
विशेष प्रमाणपत्र
आदी चन्ने (नागपूर), आर्वि गेरा (गाजियाबाद), आमेर मॅक्सिमिलन (लखनौ), अनन्या सोनागारा (नागोठाणे), अनय गोडबोले (रासायनी), अंश सोनी (छिंदवाडा), देवांश तन्ना (दुबई), जिया गोस्वामी (सुरत), संस्कृती उद्गीर (पुणे), वंश बुधलानी (धामणगाव रेल्वे), आयन बन्सल (अंबाला सिटी), अभिन्ना दास (जाेधपूर), गार्गी चक्रबोर्ती (अगरतळा), गार्गी कोल्हे (जालना), हर्ष पारेख (बडोदरा), मंदार लोहार (सातारा), रिनेश डामरे (अहमदाबाद), सौमित्र दातार (नागोठाणे), त्रिशा घोरपडे (नागपूर), यशस्वी काकड (मुंबई)
..............