त्या ३४८ मतदारांची शोधमोहिम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:07 AM2021-06-17T04:07:36+5:302021-06-17T04:07:36+5:30
उमरेड : उमरेड विधानसभा क्षेत्रात एकूण २,८९,४५८ मतदार आहेत. यापैकी ३४८ मतदारांची शोधमोहिम घेतली जात आहे. या मतदारांचे छायाचित्रच ...
उमरेड : उमरेड विधानसभा क्षेत्रात एकूण २,८९,४५८ मतदार आहेत. यापैकी ३४८ मतदारांची शोधमोहिम घेतली जात आहे. या मतदारांचे छायाचित्रच मतदार यादीत नाही. शिवाय ते स्थलांतरीत असल्याने त्यांचा पत्ता मिळेनासा झाला आहे. यामुळे ३० जूनपर्यंत या मतदारांनी आपली छायाचित्रे जमा न केल्यास त्यांची नावे मतदार यादीतून वगळली जाणार आहे. फोटो नसलेल्या या मतदारांची यादी उमरेड, भिवापूर आणि कुही तहसील कार्यालय, पंचायत समिती, नगर परिषद वा नगर पंचायत येथे उपलब्ध असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी प्रमोद कदम यांनी दिली.
उमरेड विधानसभा क्षेत्रातील एकूण मतदारांपैकी १,३६० मतदारांचे छायाचित्र मतदार यादीवर नव्हते. या मतदारांचे छायाचित्र गोळा करण्यासाठी केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांची नियुक्ती केल्या गेली यापैकी ३४८ मतदार स्थलांतरित असल्याचे या अधिकाऱ्यांच्या सर्वेक्षणानंतर लक्षात आले आहे.