सरपंच आता आमदारांप्रमाणेच घेणार पद व गोपनीयतेची शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 08:07 PM2019-08-22T20:07:28+5:302019-08-22T20:08:23+5:30

सरपंचांचा सन्मान उंचावण्यासोबत ग्रामविकासाच्या कामासाठी त्यांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने निवडीनंतर पद आणि गोपनीयतेची शपथ देण्याचा महत्त्वाचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे.

Sarpanch will now take oath of office and secrecy as MLAs do | सरपंच आता आमदारांप्रमाणेच घेणार पद व गोपनीयतेची शपथ

सरपंच आता आमदारांप्रमाणेच घेणार पद व गोपनीयतेची शपथ

googlenewsNext
ठळक मुद्देगावचा सरपंच आता अधिक सक्षम

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सरपंचांचा सन्मान उंचावण्यासोबत ग्रामविकासाच्या कामासाठी त्यांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने निवडीनंतर पद आणि गोपनीयतेची शपथ देण्याचा महत्त्वाचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. त्यामुळे आता सरपंचसुद्धा मंत्री, आमदार, खासदार यांच्याप्रमाणे पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत. या निर्णयामुळे सरपंचही आता अधिक सक्षम होणार आहे.
यासोबतच राज्यातील २७ हजार ८५४ सरपंच आणि उपसरपंचांना १ जुलै २०१९ पासून सध्याचे मानधन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. याचा लाभ सर्व सरपंचांना मिळणार आहे. या निर्णयानुसार लोकसंख्येच्या निकषानुसार मानधन देण्यात येणार आहे. दोन हजारापर्यंत लोकसंख्या असणाऱ्या गावासाठी एक हजाराऐवजी तीन हजार रुपये मानधन, २००१ ते ८ हजार लोकसंख्येसाठी १५०० ऐवजी चार हजार आणि आठ हजारापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीसाठी दोन हजार ऐवजी पाच हजार रुपए मानधन वाढविण्यात आले आहे.
उपसरपंचांचे मानधन अशाच पद्धतीने लोकसंख्येच्या निकषानुसार अनुक्रमे १०००, १५०० आणि २००० दरमहा देण्यात येणार आहे. सरपंचांच्या मानधनामध्ये लक्षणीय वाढ करण्यासाठी २०० कोटी रुपयांचा भरीव आर्थिक निधी नुकत्याच सादर झालेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पात मान्य करण्यात आला होता. या निर्णयामुळे ग्रामविकासासाठी झटणाºया सरपंचांना मोठे प्रोत्साहन मिळेल.
सरपंचांची निवड थेट जनतेतून करण्याचा महत्त्वाचा निर्णय शासनाने यापूर्वीच घेतला आहे. यामुळे सरपंचांना पूर्ण क्षमतेने सलग पाच वर्षे काम करता येईल. ग्रामपंचायत सरपंचांची निवड आतापर्यंत ग्रामपंचायतीच्या सदस्यांमधून केली जात होती. राज्यातील ९ हजार ३९५ सरपंचांची निवड थेट जनतेमधून करण्यात आली आहे.
ग्रामपंचायतींना स्वमालकीची इमारत
ग्रामपंचायतींना स्वमालकीची स्वतंत्र इमारत असावी यासाठी बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेमुळे सरपंचांना आपल्या कामकाजासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत भवन उपलब्ध होईल. राज्यातील इमारत नसलेल्या ४ हजार २५२ ग्रामपंचायतींना इमारती बांधून दिल्या जाणार आहेत.

Web Title: Sarpanch will now take oath of office and secrecy as MLAs do

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.