२५ लाख शेतकऱ्यांना संगणकीकृत सातबारा घरपोच; नागपूर विभागात ९९.३१ टक्के मोफत वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2022 08:24 PM2022-03-24T20:24:12+5:302022-03-24T20:24:45+5:30

Nagpur News नागपूर विभागातील २४ लाख ८९ हजार ७१९ नवीन स्वरूपातील सुधारित गाव नमुना सातबारा मोफत वाटप करण्यात आला आहे. विभागातील ९९.३१ टक्के वाटपाचे काम पूर्ण झाले आहे.

Satbara home delivery to 25 lakh farmers; 99.31 percent free distribution in Nagpur division | २५ लाख शेतकऱ्यांना संगणकीकृत सातबारा घरपोच; नागपूर विभागात ९९.३१ टक्के मोफत वाटप

२५ लाख शेतकऱ्यांना संगणकीकृत सातबारा घरपोच; नागपूर विभागात ९९.३१ टक्के मोफत वाटप

Next
ठळक मुद्देनागपूर, भंडारा, चंद्रपूर व गडचिरोली १०० टक्के


नागपूर : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संगणकीकृत डिजिटल स्वाक्षरी असलेला शेतीचा अधिकार अभिलेख सातबारा मोफत शेतकरी खातेदाराच्या घरोघरी जाऊन देण्यासाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेंतर्गत नागपूर विभागातील २४ लाख ८९ हजार ७१९ नवीन स्वरूपातील सुधारित गाव नमुना सातबारा मोफत वाटप करण्यात आला आहे. विभागातील ९९.३१ टक्के वाटपाचे काम पूर्ण झाले आहे.

महात्मा गांधी यांच्या स्वराज्य संकल्पनेत म्हणजेच संपूर्ण स्वातंत्र्यामध्ये शेती ही सर्व विकासाची आधारशिला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे योगदान विचारात घेऊन महात्मा गांधी यांच्या जयंतीपासून संगणकीकृत डिजिटल स्वाक्षरी असलेल्या अधिकार अभिलेखविषयक सातबारा अद्ययावत उताऱ्याच्या प्रती गावामध्ये तलाठ्यामार्फत प्रत्येक शेतकरी खातेदारास घरोघरी जाऊन मोफत देण्याची मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेंतर्गत नागपूर विभागात १६ लाख ५१ हजार ९४४ खातेदारांना २४ लाख ८९ हजार ७१९ संगणकीकृत सातबारा मोफत वाटप करण्यात आला असल्याची माहिती विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी दिली.

नवीन स्वरूपातील सुधारित गाव नमुना सातबारा घरपोच मोफत वाटपाच्या मोहिमेमध्ये नागपूर, भंडारा, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात शंभर टक्के वाटपाचे काम पूर्ण झाले आहे, तर गोंदिया जिल्ह्यात ९९.६९ टक्के, वर्धा जिल्ह्यात ९६.२२ टक्के म्हणजेच विभागात ९९.३१ टक्के मोफत संगणकीकृत सातबारा शेतकऱ्यांना घरपोच उपलब्ध करून देण्यात आला. यासाठी भूमिअभिलेख विभागाने संपूर्ण तांत्रिक साहाय्य उपलब्ध करून दिले आहे.

 

Web Title: Satbara home delivery to 25 lakh farmers; 99.31 percent free distribution in Nagpur division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार