मिहानमध्ये सॅटेलाईट मॅन्युफॅक्चरिंग युनिट
By admin | Published: February 20, 2016 03:14 AM2016-02-20T03:14:46+5:302016-02-20T03:21:18+5:30
मिहान प्रकल्पांमध्ये कॅनडा येथील मिलिंद पिंपरीकर यांच्या सहकार्याने कॅनिएसतर्फे सॅटेलाईट मॅन्युफॅक्चरिंग युनिट उभारणार असल्याची माहिती...
नितीन गडकरी यांची माहिती : ५० एकर जागेवर १५० कोटींची गुंतवणूक
नागपूर : मिहान प्रकल्पांमध्ये कॅनडा येथील मिलिंद पिंपरीकर यांच्या सहकार्याने कॅनिएसतर्फे सॅटेलाईट मॅन्युफॅक्चरिंग युनिट उभारणार असल्याची माहिती केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे दिली. यासंदर्भात सामंजस्य करार यावेळी करण्यात आला. याप्रसंगी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मिहानचे प्रबंध संचालक विश्वास पाटील उपस्थित होते.
मिलिंद पिंपरीकर हे बंगळुरु येथे युनिट टाकणार होते. परंतु मिहानमध्ये ५० एकर जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्या जमिनीवर १५० कोटी रुपयांची गुंतवणूक सॅटेलाईटसाठी करण्यात येणार असून त्यामुळे ४०० ते ५०० लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. पिंपरीकर हे विविध देशांमध्ये कृषी ,रेल्वे, रस्ते या क्षेत्रातही सॅटेलाईटचा पुरवठा करण्याचे काम करीत आहे. इस्रोसोबत एमआरओ सेंटरसाठी ते काम करीत आहे. जगातील अनेक देशांमध्ये त्यांची कामेही सुरू आहेत याकडेही गडकरी यांनी लक्ष वेधले आहे. (प्रतिनिधी)
कमी दरात
सॅटेलाईट उपलब्ध
करून देणार
कॅनडातील कॅनिएस या कंपनीचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद पिंपळकर यांनी सांगितले की, त्यांची कंपनी ही माईको, नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर करून मागणीनुसार सॅटेलाईट तयार करून देते. रेल्वे वाहतूक व्यवस्थापन, जहाज, आणि इतर लहान मोठ्या कामांसाठी विभागनिहाय सॅटेलाईटचा उपयोग होतो. शेतीपासून तर प्रत्येक क्षेत्रात आज सॅटेलाईटची गरज आहे. ही गरज आपली कंपनी पूर्ण करून देण्याचा प्रयत्न करते. एका मोठ्या सॅटेलाईटसाठी ३०० ते ४०० मिलियन डॉलर इतका खर्च येतो. परंतु आमची कंपनी १ ते ५ मिलियन डॉलरमध्य सॅटेलाईट उपलब्ध करून देते. भविष्यातील विमाने ही वायरलेस राहतील.