सात्विक चारित्र्यच राष्ट्रनिर्माणाच्या कामी येते

By admin | Published: December 26, 2016 02:43 AM2016-12-26T02:43:04+5:302016-12-26T02:43:04+5:30

रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे काम फक्त शिक्षण देणे नसून युवा पिढीमध्ये सात्विक चारित्र्य निर्माण करण्याचेही आहे.

Satvic Charitry is a work of nation-building | सात्विक चारित्र्यच राष्ट्रनिर्माणाच्या कामी येते

सात्विक चारित्र्यच राष्ट्रनिर्माणाच्या कामी येते

Next

राज्यपाल बनवारीलाल पुरोहित : रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात पदवीदान समारंभ
नागपूर : रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे काम फक्त शिक्षण देणे नसून युवा पिढीमध्ये सात्विक चारित्र्य निर्माण करण्याचेही आहे. सात्विक चारित्र्यच विषयनिष्ठ शिक्षणाला राष्ट्रनिर्माणाच्याप्रति सक्रिय करू शकते, असे सांगत विद्यार्थ्यांनी नेहमी सत्याच्या वाटेवर चालावे, असे आवाहन आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी केले.
रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा पदवीदान समारंभात शनिवारी थाटात पार पडला. अध्यक्षस्थानी आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित होते. रामदेवबाबा महाविद्यालयाला स्वायत्तता मिळाल्यानंतर ३०४८ पदवीधर पदवी घेऊ बाहेर पडले. यापैकी ११०० पदवीधारकांना पालक, शिक्षक व मित्रमंडळींच्या उपस्थितीत पदवी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून आसामच्या तेजपूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. मिहीर चौधरी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे उपस्थित होते. यावेळी सत्यनारायण नुवाल, अ‍ॅड. चंद्रकांत ठाकर, गोविंदलाल अग्रवाल, प्राचार्य डॉ. रासु पांडे, डॉ. डी.के. अग्रवाल, तंत्रशिक्षण सहसंचालक गुलाबराव ठाकरे, डॉ. एन.के. चौधरी उपस्थित होते.
राज्यपाल पुरोहित यांच्या हस्ते समारंभाचे उद्घाटन झाले. कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी पदवीधारकांना सत्यमवद, धर्मचर, स्वाध्ययन, असा वैदिक काळापासून चालत आलेला परिपाठ समजावून सांगितला.
जागतिकीकरणात स्पर्धा वाढली असून देशाची मान आपल्या कृतीने उंचावण्याचे आवाहन त्यांनी पदवीधारकांना केले. प्रो. मिहीर के. चौधरी यांनी आपल्या भाषणात स्नातकांना त्याची जबाबदारी समजून राष्ट्रहितासाठी झटण्याचे तसेच भारताला जागतिक अर्थकारणात पुढे नेण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
परीक्षा नियंत्रक डॉ. अरोरा यांच्या मार्गदर्शनाखाली पदवीधारकांनी शपथ ग्रहण केली. प्राचार्य डॉ. रा. सु. पांडे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. प्रा. आकांक्षा देशपांडे व प्रा. प्रतिऋति सिंग अग्रवाल यांनी संचालन केले.(प्रतिनिधी)

रामदेवबाबा पदक जाहीर
यावेळी रामदेवबाबा पदक प्रथमच जाहीर करण्यात आले. २०१५ साठी हा सन्मान पूजा संजय पलोड हिला जाहीर करण्यात आला तर २०१६ साठी अनुज किशोर फोले ही या पदकाची मानकरी ठरली.

 

Web Title: Satvic Charitry is a work of nation-building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.