घोषित आणीबाणी विरोधात ‘आप’चा सत्याग्रह, महात्मा गांधी पुतळ्यासमोर आंदोलन

By कमलेश वानखेडे | Published: April 16, 2023 04:39 PM2023-04-16T16:39:03+5:302023-04-16T16:39:15+5:30

सीबीआयच्या माध्यमातून दडपशाही सुरू असून देशात अघोषित आणीबाणी लागू झाली असल्याचा आरोप करीत ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी व्हेरायटी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर धरणे दिले.

Satyagraha of 'AAP' against declared emergency, protest in front of Mahatma Gandhi statue | घोषित आणीबाणी विरोधात ‘आप’चा सत्याग्रह, महात्मा गांधी पुतळ्यासमोर आंदोलन

घोषित आणीबाणी विरोधात ‘आप’चा सत्याग्रह, महात्मा गांधी पुतळ्यासमोर आंदोलन

googlenewsNext

नागपूर : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने १६ एप्रिल रोजी चौकशीसाठी बोलवले असल्याने त्याचा निषेध करण्यासाठी रविवारी आम आदमी पार्टी तर्फे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. सीबीआयच्या माध्यमातून दडपशाही सुरू असून देशात अघोषित आणीबाणी लागू झाली असल्याचा आरोप करीत ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी व्हेरायटी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर धरणे दिले.

विदर्भ संयोजक डॉ देवेंद्र वानखडे, राज्य कोषाध्यक्ष जगजीत सिंग यांच्या नेतृत्वात व नागपूर संयोजक कविता सिंघल, विदर्भ सहसंयोजक अमरीश सावरकर, पश्चिम विदर्भ सहसंयोजक संजय हेडाऊ, विदर्भ हेल्थविंग संयोजक डॉ शाहिद अली जाफरी, नागपूर संघटनमंत्री शंकर इंगोले, नागपूर सचिव भूषण ढाकुलकर, राकेश उराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्याग्रह करण्यात आला. दिल्लीतील जनतेला जागतिक दर्जाचे शिक्षण व आरोग्य तसेच मोफत वीज पाणी व महिलांना मोफत प्रवास देण्याचं काम अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने केलेले असल्यामुळे त्यांच्या मॉडेलला मोठ्या प्रमाणात जन मान्यता मिळत आहे. आता राष्ट्रीय पक्ष बनलेला आप देशभर वेगाने पसरत आहे त्यामुळेच मोदी सरकार आम आदमी पार्टीला अडचणीत आणण्याचे सर्व प्रयत्न करीत आहे, असा आरोप देवेंद्र वानखडे यांनी यावेळी केला.

दिल्ली विधानसभेमध्ये केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदी व उद्योगपती अदानी यांच्या संदर्भाने अनेक आरोप केले होते. मोदी यांच्यात काळ्या पैशाची गुंतवणूक अदानी यांच्या कंपन्यांमध्ये असल्याचा थेट आरोप केजरीवाल यांनी केला होता. तेव्हापासूनच अदानी यांना वाचवण्यासाठी केजरीवाल यांच्या विरोधात कट कारस्थान रचले जात होते, असा आरोप आपचे राज्य कोषाध्यक्ष जगजीत सिंग यांनी केला. आंदोलनात अजिंक्य कळंबे, रोशन डोंगरे, अजय धर्मे, मनोज दफरे, श्रीकांत कामडी, अभिजीत झा, लक्ष्मीकांत दांडेकर, प्रदीप पौनिकर, डॉ.अमेय नारनवरे, आकाश कावळे, जॉय बांगडकर, महेश बावनकुळे, हरीश गुरबानी, सुरेश खर्चे, प्रभात अग्रवाल सचिन पारधी,श्याम बोकेडे, उमाकांत बनसोड, सोनु फटिंग, धीरज आगाशे, संजय जीवतोडे आदींनी भाग घेतला.

Web Title: Satyagraha of 'AAP' against declared emergency, protest in front of Mahatma Gandhi statue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर