सावनेर, काटोल, हिंगणा कामठीत कोरोनाचा कहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:09 AM2021-04-01T04:09:34+5:302021-04-01T04:09:34+5:30
सावनेर/ कळमेश्वर/ कामठी/ काटोल/ नरखेड/ उमरेड/ कुही/ रामटेक/ कन्हान : नागपूर जिल्ह्यातील तेरा तालुक्यांत बुधवारी ९९७ रुग्णांची नोंद ...
सावनेर/ कळमेश्वर/ कामठी/ काटोल/ नरखेड/ उमरेड/ कुही/ रामटेक/ कन्हान : नागपूर जिल्ह्यातील तेरा तालुक्यांत बुधवारी ९९७ रुग्णांची नोंद झाली. यासोबतच सावनेर, काटोल आणि हिंगणा तालुक्यातील वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत वाढ झाली आहे. सावनेर तालुक्यात बुधवारी २२५ रुग्णांची नोंद झाली तर रुग्णांचा मृत्यू झाला. सावनेर शहरात १०६ तर ग्रामीणमध्ये ११९ रुग्णांची नोंद झाली.
हिंगणा तालुक्यात ६७१ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात १११ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात वानाडोंगरी येथील ५६, डिगडोह १५, नीलडोह १३, हिंगणा व टाकळघाट येथेळी प्रत्येकी ६, इसासनी ५, मोंढा, गुमगाव येथे प्रत्येकी ३, खापरी गांधी २ तसेच सुकळी घारापुरी, खैरीपन्नासे व कोतेवाडा येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद करण्यात आली.
काटोल तालुक्यात आणखी १०३ रुग्णांची भर पडली. यात काटोल शहरातील ३९ तर ग्रामीण भागातील ६४ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात कलंभा येथे ७, कोंढाळी ६, येनवा ५, मूर्ती, लाडगाव, कोहळा, वाढोणा, पारडसिंगा, गोन्ही येथे प्रत्येकी ४, मुकणी ३, चारगाव, कुकडी पांजरा, इसापूर येथे प्रत्येकी २ रुग्ण तर कचारीसावंगा, पंचधार, डोरली (भिंगारे), हातला, घुबडी, मसली, शिरसावाडी, मेंडकी, चिचोली, वंडली, कारला, डोरली (भांडवलकर), पानवाडी येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. पारशिवनी तालुक्यातील कन्हान प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत १४४ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात ४१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
कळमेश्वर तालुक्यात २२ रुग्णांची नोंद झाली. त्यात कळमेश्वर-ब्राह्मणी न.प. क्षेत्रातील दोन रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात गोंडखैरी ७, धापेवाडा ५, आदासा, निमजी येथे प्रत्येकी २ तर भंडागी, चौदामैल, तेलकामठी, तिंडगी येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.
उमरेड तालुक्यात बुधवारी ३७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यात शहरातील २४ तर ग्रामीण भागातील १३ रुग्णांचा समावेश आहे.
नरखेड तालुक्यात ४१ रुग्णांची नोंद झाली. यात नरखेड शहरातील ९ तर ग्रामीण भागातील ३२ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २७४ तर शहरातील ४२ इतकी आहे. कुही तालुक्यातील चारही प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ३९७ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात ४९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात कुही येथे ९, टेंभरी २, सिल्ली ५, बोरी २, मांढळ २, हरदोली नाईक १६, सोनपुरी ६ तर चापेगडी, अंबाडी, वेलतुर, तारणा, खैरलांजी, कऱ्हांडला व साळवा येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
रामटेक तालुक्यात ३१ रुग्णांची भर पडली. यात रामटेक शहरातील ८ तर ग्रामीण भागातील २३ रुग्णांचा समावेश आहे.
कामठी ग्रामीणमध्ये धोका अधिक
कामठी तालुक्यात बुधवारी ७५ रुग्णांची नोंद झाली. यात कामठी शहरातील २६ तर कामठी कंटेनमेंट परिसरातील ४ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात महादुला १९, कोराडी ८, धारगाव येथे ७ तर नांदा, पांजरा येथे प्रत्येकी ४ तसेच खापा, लोणखैरी, पवणगाव येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.