जेईईमध्ये सौरभ विदर्भात टॉपर

By admin | Published: June 13, 2016 03:07 AM2016-06-13T03:07:47+5:302016-06-13T03:07:47+5:30

देशातील आयआयटीमध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या ‘जेईई-अ‍ॅडव्हान्स’चा निकाल रविवारी घोषित करण्यात आला.

Saurabh Vidarbha Topper in JEE | जेईईमध्ये सौरभ विदर्भात टॉपर

जेईईमध्ये सौरभ विदर्भात टॉपर

Next

१८० विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र
नागपूर : देशातील आयआयटीमध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या ‘जेईई-अ‍ॅडव्हान्स’चा निकाल रविवारी घोषित करण्यात आला. या परीक्षेत अखिल भारतीय स्तरावर १८३ वी रँक घेणारा नागपूरचा सौरभ टोटे विदर्भात टॉपर ठरला. सौरभ हा डॉ.आंबेडकर कॉलेजचा विद्यार्थी आहे. ओबीसीमधून सौरभची २० वी रँक आली आहे. अखिल भारतीय स्तरावर २१६ वी रँक घेणारा पीयूष राठी दुसऱ्या स्थानी तर २५१ वी रँक घेणारा सौरव रे तिसऱ्या स्थानावर आहे. गेल्या महिन्यात घेण्यात आलेली जेईई-अ‍ॅडव्हान्समध्ये विदर्भातून २००० विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. या वर्षी परीक्षेचे आयोजन आयआयटी गुवाहाटीने केले होते. दरम्यान संकेतस्थळ जाम झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहताच आला नाही. तज्ज्ञाच्या मते, या वर्षी विदर्भाचा निकाल निराशाजनक लागला. मिळालेल्या माहितीनुसार विदर्भातून केवळ १८० विद्यार्थ्यांना यात यश मिळाले. बहुसंख्य विद्यार्थ्यांना त्यांच्या अपेक्षानुसार रँक मिळाली नाही. टॉप ५०० मध्ये फार कमी विद्यार्थी आल्याची माहिती आहे.
निकालाची माहिती मिळताच विद्यार्थ्यांसोबतच कॉलेज आणि शिकवणी वर्गाने निकाल पाहण्यासाठी प्रयत्न सुरू केले. परंतु निकाल पाहण्यासाठी त्यांना तासन्तास वाट पहावी लागली. एका विद्यार्थ्याने सांगितले की, सकाळपासूनच वेबसाईट (संकेतस्थळ) संथ गतीने चालत होते.
(प्रतिनिधी)

Web Title: Saurabh Vidarbha Topper in JEE

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.