नागपूर जिल्ह्यातील सावनेर, गोंडखैरीत उष्माघाताचे दोन बळी ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 08:01 PM2019-06-03T20:01:43+5:302019-06-03T20:04:54+5:30
पाऱ्याने ४७ अंशाचा टप्पा पार केला आहे. उन्हाच्या काहिलीने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच सावेनर येथील बसस्थानक परिसर आणि कळमेश्वर तालुक्यातील गौंडखेरी येथे अज्ञात व्यक्तीचे प्रत्येकी एक मृतदेह आढळून आले आहे. या मृतदेहांच्या अंगावर कोणत्याही जखमा व इतर संशास्पद बाबी आढळून न आल्याने उष्माघाताने यांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोेलिसांनी व्यक्त केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (सावनेर/गोंडखैरी) : पाऱ्याने ४७ अंशाचा टप्पा पार केला आहे. उन्हाच्या काहिलीने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच सावेनर येथील बसस्थानक परिसर आणि कळमेश्वर तालुक्यातील गौंडखेरी येथे अज्ञात व्यक्तीचे प्रत्येकी एक मृतदेह आढळून आले आहे. या मृतदेहांच्या अंगावर कोणत्याही जखमा व इतर संशास्पद बाबी आढळून न आल्याने उष्माघाताने यांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोेलिसांनी व्यक्त केला आहे. नागपूर-अमरावती महामार्गावरील गोंडखैरी परिसरातील जिंदल लॉजिस्टिक पार्क वेअर हाऊसच्या भिंतीच्या बाजूने सोमवारी सकाळी १० वाजता अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. स्थानिकांनी या घटनेची माहिती महामार्ग वाहतूक पोलिसांना दिली. यानंतर घटनास्थळी सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश हिवरकर ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. मृताने निळ्या रंगाचे शर्ट व काळा पॅन्ट घातलेला होता. मृताची अद्याप ओळख पटलेली नाही.
सावनेर बस स्थानक परिसरात सोमवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास मातीच्या ढिगाऱ्यावर एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल केला. मृताने लाल नीळा चौकडी शर्ट आणि पांढरा विटकरी रंगाचा पॅन्ट घातला होता. मृताची अद्याप ओळख पटलेली नाही.