सावनेर, कामठीत विधानसभेची सेमीफायनल; केदार, सावरकर, देशमुखांची प्रतिष्ठा पणाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2022 02:43 PM2022-11-10T14:43:27+5:302022-11-10T14:44:09+5:30
२३७ ग्रा.पं.मध्ये रंगणार रणधुमाळी
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील २३७ ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. सरपंचाची निवड थेट जनतेतून होणार असल्याने आपल्याच पक्षाचे सर्वाधिक सरपंच निवडून आणण्यासाठी राजकीय पक्षांच्या वतीने उमदेवारांच्या चाचपणीला आता वेग येणार आहे.
सावेनर मतदार संघ४९ ग्रा.पं.च्या निवडणुका होत आहे. यानिमित माजी मंत्री आ. सुनील केदार यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. कामठी-मौदा मतदार संघातील ४२ ग्रा.पं.च्या निवडणुका होत असल्याने भाजपाचे आ.टेकचंद सावरकर यांना मतदारांच्या परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. काटोल-नरखेड तालुक्यात ४९ ग्रा.पं.च्या निवडणुका होत आहेत. येथे राष्ट्रवादीला वर्चस्व सिद्ध करण्यासाठी भाजपाशी सामना करावा लागणार आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे वर्चस्व आहे. १३ पैकी ९ पंचायत समित्या काँग्रेस, ३ राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि एक पंचायत समिती शिंदे गटाच्या (बाळासाहेबांची शिवसेना) ताब्यात आहे. त्यामुळे ग्रा.पं. निवडणुकीत भाजपाचा निश्चितच कस लागणार आहे.
राज्यात सत्तापरिवर्तन झाल्यानंतर भाजपा आणि शिंदे गटाने ग्रा.पं. निवडणुकीवर फोकस केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिंदे गटातील रामटेकचे आ. अॅड. आशिष पारशिवनी तालुक्यातील २२ ग्रा.पं.च्या निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. याशिवाय शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख संदीप इटकेलवार किती ग्रा.पं.वर बाळासाहेबांच्या शिवसेनेला विजय मिळवून देतात हेही या निमित्ताने स्पष्ट होणार आहे. इटकेलवार त्यांचे पानिपत करण्यासाठी कट्टर शिवसैनिकांनी (ठाकरे गट) कंबर कसली आहे.
सावनेरमध्ये काँग्रेस गड राखणार का?
जिल्ह्यात सर्वाधिक ५९ ग्रा.पं.च्या निवडणुका सावनेर मतदारसंघात होत आहेत. सावनेरचा गड जिंकण्यासाठी भाजपाचे डॉ. राजीव पोतदार यांनी चार महिन्यापासून कबर कसली आहे. इकडे मतदारसंघातील वर्चस्व कायम ठेवण्यासाठी माजी मंत्री आ. सुनील केदार यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. जि.प. अध्यक्षा मुक्ता को मतदार असलेल्या पिंपळा डाकबगला या ग्रा.पं.ची निवडणूक होत आहे. या ग्रा.प.दर संध्या कॉग्रेसचे वर्चस्व आहे.
कामठी-मौद्यात काँग्रेस भाजपात होणार टक्कर
कामठी- मोंदा मतदारसंघातील कामठी तालुक्यातील २७ आणि मोंदा तालुक्यातील २५ ग्रा.पं.ची निवडणूक होत आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आ. टेकचंद सावरकर आणि काँग्रेसचे सुरेश भोयर ग्रा.पं. निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा आमने सामने येणार आहेत. विधानसभा निवडणुकीत मौदा तालुक्यात काँग्रेसचे पारडे जड होते. कामठी मतदारसंघातून काँग्रेसच्या अवंतिका लेकुरवाळे यांची जि.प.च्या महिला व बाल कल्याण सभापतीपदी वर्णी लागली आहे. त्यामुळे लेकुरवाळे यांना या दोन्ही तालुक्यांत काँग्रेसचे सर्वाधिक सरपंच विजयी करण्यासाठी जोर लावावा लागणार आहे.
शिंदे गट चमत्कार करणार?
रामटेक पं.स.वर झेंडा फडकविल्यानंतर शिंदे गटाचे आ. अॅड. आशिष जयस्वाल यांचा मतदारसंघ असलेल्या रामटेक तालुक्यातील ८ आणि पारशिवनी तालुक्यातील २२ ग्रा.पं.मध्ये निवडणूक होत आहे. येथे त्यांना कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, चंद्रपाल चौकसे यांच्याशी सामना करावा लागणार आहे. जि.प. अध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या शांता कुमरे यांना संधी मिळाली नसल्याने रामटेकमध्ये काँग्रेसच्या नेत्याविषयी नाराजी आहे. सभापती राजकुमार कुसुंबे यांनाही पारशिवनीत कॉंग्रेसची ताकद दाखवावी लागेल.
उमरेडमध्ये पारवे विरुद्ध पारवे
उमरेड मतदारसंघात उमरेड तालुक्यातील ७, भिवापूर तालुक्यातील १० आणि कुही तालुक्यातील ४ ग्रा.पं.च्या निवडणुका होत आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर मतदारसंघात भाजपाचे सुधीर पारवे अधिक सक्रिय झाले. कुही नगरपंचायत, उमरेड पंचायत समितीवर वर्चस्व मिळाल्यानंतर काँग्रेसचे आ. राजू पारवे यांना ग्रा.पं. निवडणुकीच्या निमित्ताने कर्तृत्व सिद्ध करावे लागणार आहे. मिलिंद सुटे यांची जि.प. सभापतीपदी निवड झाली असली तरी ग्रा.पं. निवडणुकीत आमदाराच्या खांद्याला खादा लावून काम करावे लागणार आहे.
काटोल-नरखेडमध्ये राष्ट्रवादी भाजपात सामना
काटोल तालुक्यातील २७ आणि नरखेड तालुक्यातील २२ ग्रा.पं.ची निवडणूक होत आहे. आ. अनिल देशमुख यांच्या अनुपस्थित जि.प. सभापती बाळू जोध आणि जि.प. सदस्य सलील देशमुख यांना पक्षांतर्गत गटबाजीला सामोरे जात राष्ट्रवादीचा किल्ला लढवावा लागणार आहे. मात्र, काटोल नरखेडमध्ये आरपारची लढाई करण्याचा संकल्प भाजपाचे चरणसिंग ठाकूर यांनी केला असल्याने येथे ग्रा.पं. निवडणुकीत अटीतटीचा सामना पाहायला मिळणार आहे.
हिंगणा - नागपूरमध्ये कोण मारणार मैदान?
हिंगणा तालुक्यातील ७, तर नागपूर ग्रामीण तालुक्यातील १० ग्रा.पं.मध्ये निवडणूक होत आहे. राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री रमेश बंग यांच्या रायपूर ग्रा.पं.मध्ये निवडणूक होत आहे. हिंगणा मतदारसंघात भाजपाचे आ. समीर मेघे यांनी गत साडेतास वर्षांत ग्रामीण भागावर अधिक फोकस केला आहे. त्यामुळे येथे ग्रा.पं. निवडणुकीत भाजपा- राष्ट्रवादी, असा थेट सामना होईल. नागपूर ग्रामीण तालुक्यात काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. याशिवाय जि.प.ची परीक्षा पास केल्यानंतर उपाध्यक्षा कुंदा राऊत यांना ग्रा.पं. निवडणुकीच्या निमित्ताने भाजपाच्या यंग ब्रिगेडशी टक्कर द्यावी लागणार आहे.
येथे होणार निवडणूक
भिवापूर तालुका (१० ग्रा.पं.) : बेसूर, इंदापूर, गोंडबोरी, कारगाव, चिचाळा, मांगरूळ, टाका, पांढरवाणी, पेंढराबोडी, सरांडी
उमरेड तालुका (७ ग्रा.पं.) : सिर्सी, बेला, मकरधोकडा, पिपरा, सावंगी बुजरूक, ठोंबरा, आपतूर
कुही तालुका (४ ग्रा.पं.) : मांढळ, वग, डोंगरमोंदा, चना
मौदा तालुका (२५ ग्रा.पं.) : चिचोली, नंदापुरी, नेरला, एसंबा, निसतखेडा, चाचेर, राजोली, नांदगाव, खरडा, अरोली, खंडाळा, तारसा, विरशी, रेवराल, निमखेडा, धनी, वाकेश्वर, धानोली, माथनी. कोडमेडी, खात, गोवरी, धानला, महालगाव, चिरव्हा
रामटेक तालुका (८ ग्रा.पं.) : नगरधन, मनसर, पटगोवारी, अजनी, आसोली, हिवरा हिवरी, मुसेवाडी, भिलेवाडा
पारशिवनी तालुका (२२ ग्रा.पं.) : टेकाडी ( कोळसा खदान), निलज, खंडाळा (डुमरी), वाघोडा, बखारी, करंभाड, कान्द्री, पारडी, डुमरीकला, तामसवाडी, खंडाळा (मरियंबी), पालोरा, नयाकुंड, गोंडेगाव, नांदगाव, बोरडा (गनेशी), दहेगाव (जोशी). सालई (मोकासा), जुनीकामठी, तामसवाडी, सालई (माहुली). मेहंदी, साटक
सावनेर तालुका (३६ ग्रा.पं.) : केळवद, उमरी (भ), खेरी ढालगाव, सावळी (मो), विचवा, कोथुळणा, चिचोली, ईसापूर, पिपळा डाकबंगला, बोरुजवाडा, वेलतूर, सिल्लोरी, चांपा, कुसुंबी, भेंढाळा, टाकळी (भ), सिल्लेवाडा, वलनी,
तिघई, बडेगाव, परसोडी, जोगा, सालई, मंगसा, नांदागोमुख, पंढरी, रामपुरी, खानगाव, कोच्छी, कोदेगाव, रोहणा, माळेगाव टाऊन, गोसेवाडी, सावरमेंढा, ब्रम्हपुरी, भानेगाव.
कळमेश्वर तालुका (२३ ग्रा.पं.) : पिल्कापार, तेलकामठी, घोराड, खुमारी, बोरगाव (बु), मडासावंगी, म्हसेपठार, बुधला, तिष्टी (बु). उपरवाही, परसोडी, पानउबाळी, गोंडखैरी, तेलगाव, मांडवी, पिपळा (किनखेडे), कळंबी, वरोडा, वाढोणा (बुद्रुक), उबाळी, सावळी (बुद्रुक) पारडी (देशमुख), नीळगाव.
काटोल तालुका (२७ ग्रा. पं.) : वंडली खुर्द, येरला धोटे, गोडी दिग्रस, खामली, राजनी, झिलपा, मेंडकी, इसापूर खुर्द, इसापूर बु.. अंबाडा सोनक, वळापूर, हातला, वडली मूर्ती, मेडेपठार (बाजार), आंजनगाव, चारगाव, राउळगाव, कोंढाळी, गरमसूर, घुबडी, पांजरकाटे, दुधाळा, मासोद, चिखली (मासोद), चंदनपार्डी, सोनखांब
नरखेड तालुका (२२ ग्रा.पं.) : सिगारखेडा, पिंपळगाव (राऊत), सिंदी उमरी, लोहारी सावंगा, जामगाव बु, दावसा, रामठी, तिनखेडा, खंडाळा (बु), मेंढला, वडविहिरा, मसोरा, उमरी सिंदी, अंबाडा देशमुख, खेडीकर्यात, वडेगाव उमरी, खराळा. थुगाव निपाणी, आग्रा, बेलोना, आरंभी, मायवाडी.
कामठी तालुका (२७ ग्रा.पं.) : येरखेडा, रनाळा, बिना, भिलगाय, खैरी, खसाळा, सुरादेवी, खापा, कढोली, भोवरी, आजनी, लिहिगाव, कापसी (बु), गादा, सोनेगाव, गुमथी, आवंढी, गुमथळा, तरोडी (बु), परसोडी, जाखेगाव, केम, दिघोरी, आडका, शिवानी, भुगाव, वडोदा
हिंगणा तालुका (७ ग्रा.पं.) : वागदरा, खैरी पन्नासे, नागलवाडी, रायपूर, चिचोली, कवडस, उमरी वाघ
नागपूर ग्रामीण तालुका (१९ ग्रा.पं.) : व्याहाड, सावंगा, गुमथळा, बेलवाडा, बोखारा, घोगली, फेटरी, खंडाळा, खडगाव, वलनी, लाव्हा, माहुरझरी, ब्राम्हणवाडा, उमरगांव, ब्राम्हणी, सोनेगांव (बोरी), जामठा, भरतवाडा, पेठेसूर