काेराेना संक्रमणात सावनेर, कळमेश्वर अग्रणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:08 AM2021-04-05T04:08:49+5:302021-04-05T04:08:49+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क सावनेर/कळमेश्वर/रामटेक/कामठी/उमरेड/नरखेड : नागपूर शहरासह जिल्ह्यात रविवारी (दि. ४) एकूण ४,११० रुग्णांची नाेंद करण्यात आली असून, यातील ...

Savner, Kalmeshwar pioneer in Kareena transition | काेराेना संक्रमणात सावनेर, कळमेश्वर अग्रणी

काेराेना संक्रमणात सावनेर, कळमेश्वर अग्रणी

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

सावनेर/कळमेश्वर/रामटेक/कामठी/उमरेड/नरखेड : नागपूर शहरासह जिल्ह्यात रविवारी (दि. ४) एकूण ४,११० रुग्णांची नाेंद करण्यात आली असून, यातील ६२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात काेराेना संक्रमणामध्ये सावनेर व कळमेश्वर तालुका आघाडीवर आहे. सावनेर तालुक्यात २७३, कळमेश्वरमध्ये १७१, हिंगण्यात १०६, रामटेक तालुक्यात ६३, कामठीत ५५, उमरेडमध्ये ४७ तर नरखेड तालुक्यात सात नवीन रुग्णांची नाेंद करण्यात आली.

सावनेर तालुक्यात २७३ नवीन रुग्णांची नाेंद करण्यात आली असून, यातील ११७ रुग्ण सावनेर शहरातील तर १५६ रुग्ण तालुक्यातील विविध गावांमधील आहेत. कळमेश्वर तालुक्यातील १७१ रुग्ण आढळून आले. यात कळमेश्वर-ब्राह्मणी शहरातील १४४ रुग्ण असून, तालुक्यातील तेलकामठी येथील सहा, मोहपा चार, सवंद्री तीन, तिडंगी, धापेवाडा व पानउबाळी प्रत्येकी दाेन तर तिष्टी (बु), तिष्टी (खुर्द), सोनुली, मांडवी, म्हसेपठार, कन्याडोल, खुमारी व पिपळा येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

Web Title: Savner, Kalmeshwar pioneer in Kareena transition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.