‘मोठा भाऊ’ सांगा, राम मंदिर कधी बनणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 10:36 AM2018-03-26T10:36:20+5:302018-03-26T10:37:57+5:30

गेल्या चार वर्षात राम मंदिराच्या मुद्यावर अपयशी राहिलेल्या केंद्र सरकारवर टीका करीत विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढविला.

Say 'Big Brother', When Will Ram Temple Become? | ‘मोठा भाऊ’ सांगा, राम मंदिर कधी बनणार ?

‘मोठा भाऊ’ सांगा, राम मंदिर कधी बनणार ?

Next
ठळक मुद्देप्रवीण तोगडिया यांचा सवालपंतप्रधान मोदींच्या भूमिकेवर उपस्थित केले प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या चार वर्षात राम मंदिराच्या मुद्यावर अपयशी राहिलेल्या केंद्र सरकारवर टीका करीत विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढविला. सर्वच जण आपल्या ‘मन की बात’ करीत आहेत. रामजीच्या मनातील बात तर कुणी ऐका. भगवान राम यांना अयोध्येत राहण्यासाठी घर नाही. त्यांना घर कधी मिळेल, याचे उत्तर माझा ‘मोठा भाऊ ’अर्थात नरेंद्र मोदींनी द्यावे, असेही ते म्हणाले.
रामनवमीच्या पर्वाचे निमित्त साधत धंतोली येथील विहिंप कार्यालयात पत्रकारांशी चर्चा करताना डॉ. तोगडिया म्हणाले, राम मंदिराबाबत १९८४ पासून प्रकरण सुरू आहे.
सद्यस्थितीत न्यायालयाच्या निर्णयानंतर मंदिर उभारले जाईल, असे सरकार सांगत आहे. असे आहे तर राम मंदिराच्या मुद्यावर आंदोलन का उभारण्यात आले. लाखो कार सेवक एकत्र आले, हजारोंना तुरुंगात जावे लागले. शेकडोंनी बलिदान दिले. मात्र, २०१४ मध्ये सत्ता सांभाळताच राम मंदिरला विसरले. गेल्या चार वर्षांपासून आपण या मुद्यावर सरकारला जाब विचारत आहोत. मात्र, काहीच उत्तर मिळत नाही. दहा दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून राम मंदिराबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन केले होते. केंद्रात भाजपाचे सरकार बहुमतात आहे. कायदा तयार करून राम मंदिर उभारायला हवे. न्यायालयाचा निर्णय आला तर पुन्हा वाद तयार होतील. मंदिरासमोर मशीद उभारली जाईल. हिंदूंना हे कधीच मान्य राहणार नाही, असेही ते म्हणाले.
तोगडिया म्हणाले. १९७२ पासून आपले मोदींशी व्यक्तिगत संबंध आहेत. आपले त्यांच्या घरी येणे जाणे राहिले आहे. मोदी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची पाकिस्तानात जाऊन भेट घेऊ शकतात, तर माझी का नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. जीवाला धोका असल्याबाबतच्या प्रश्नावर तोगडिया म्हणाले, मला माझ्या जीवाची पर्वा नाही. पूर्वी जे बोलायचे होतो, ते बोललो. आता काहीच बोलायचे नाही.
राम मंदिराबाबत संघाच्या भूमिकेबाबतच्या प्रश्नालाही बगल देत आपण स्वयंसेवक असून गेल्या ५० वर्षांपासून संघाशी संबध असल्याचे सांगत अधिक बोलण्यास त्यांनी नकार दिला. हार्दिक पटेल यांच्याशी झालेल्या भेटीबाबत विचारणा केली असता आपण कुणाशीही भेटू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आता हिंदू आंदोलन करणार नाही
तोगडिया म्हणाले, राम मंदिराच्या मुद्यावर आता हिंदू आंदोलन करणार नाही. छातीवर गोळ्या झेलणार नाहीत. आता ही सरकारची जबाबदारी आहे. संसदेत कायदा तयार करावा व अयोध्येत राम मंदिर उभारावे. रामनवमीच्या पर्वावर नागपुरात शोभायात्रेचे उद्घाटनप्रसंगी आपण हीच प्रार्थना देवाकडे केल्याचे त्यांनी सांगितले.

रोजगार, शिक्षण, कर्जमाफीत सरकार अपयशी
केंद्र सरकार २० कोटी युवकांना रोजगार, उत्तम शिक्षण, शेतकऱ्यांना कर्जमाफी. चार लाख काश्मिरी पंडितांना हक्काचे घर देण्यात अपयशी ठरली असल्याची टीका तोगडिया यांनी केली. बांग्लादेशी घुसखोरांना बाहेर काढण्यातही सरकार अपयशी ठरले. कापूस, चणा, डाळींच्या किंमती गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत ३० टक्क्यांहून कमी झाल्या आहेत. गरीब व्यक्तीचा मुलगा डॉक्टर बनू शकत नाही, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली.

Web Title: Say 'Big Brother', When Will Ram Temple Become?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा