नराधमाला फाशी द्या म्हणत सी.पी. अँड बेरारच्या विद्यार्थ्यांनी काढली रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 12:42 AM2020-02-12T00:42:13+5:302020-02-12T00:43:40+5:30
हिंगणघाट प्रकरणातील नराधमाला फाशी द्या, अशी मागणी करीत सी. पी. अँण्ड बेरार महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मंगळवारी आंदोलन केले आणि रॅली काढली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हिंगणघाट प्रकरणातील नराधमाला फाशी द्या, अशी मागणी करीत सी. पी. अँण्ड बेरार महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मंगळवारी आंदोलन केले आणि रॅली काढली.
या दरम्यान विद्यार्थ्यांनी रॅली काढून निदर्शने केली, तसेच पीडितेला श्रद्धांजली वाहिली. या रॅलीत सेवादल, कमला नेहरू, मोहता सायन्सचे विद्यार्थी सहभागी झाले होते. रेशीमबाग चौकातून रॅलीला सुरूवात होऊन सक्करदरा चौकात पोहोचल्यावर विद्यार्थ्यांनी आपल्या तीव्र भावनांना वाट मोकळी केली. पीडितेवर अन्याय करणाऱ्या नराधमाला एक महिन्याच्या आत फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. आवेशपूर्ण घोषणा देऊन या घटनेचा रोष व्यक्त केला. विद्यार्र्थिनींनी भाषणातून भावना व्यक्त केल्या. नागरिकांनीही यात सहभाग नोंदविला. या रॅलीचे आयोजन अबुझर हुसेन, पायल अरमरकर, भाग्यश्री मराठे, प्रफुल्ल रत्ने, नयन भारद्वाज, रूपल बंडावर, पूजा रंगारी, मनीषा गुप्ता, संपदा मुरकुटे, कृपशाली बोडनकर, ममता व्यवहारे, रितेश चंदनबटवे, अमोल मेश्राम, हर्षल वांढरे आदींनी केले.