बॅण्ड मास्तरच्या हाती बॅण्डबाजाऐवजी तराजू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:09 AM2021-05-07T04:09:06+5:302021-05-07T04:09:06+5:30

काटोल : कोरोनाने मनुष्याच्या जगण्याच्या पद्धतीही बदलल्या आहेत. लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार हिरावला गेला आहे. गतवर्षी मार्चपासून सार्वजनिक समारंभावर निर्बंध ...

Scales instead of bandbajas in the hands of the band master! | बॅण्ड मास्तरच्या हाती बॅण्डबाजाऐवजी तराजू!

बॅण्ड मास्तरच्या हाती बॅण्डबाजाऐवजी तराजू!

Next

काटोल : कोरोनाने मनुष्याच्या जगण्याच्या पद्धतीही बदलल्या आहेत. लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार हिरावला गेला आहे. गतवर्षी मार्चपासून सार्वजनिक समारंभावर निर्बंध असल्याने यातून रोजगार मिळविणारे आर्थिक कोंडीत सापडले आहेत. यामुळे अनेकांसमोर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे. अस्वस्थतेने अनेकांनी व्यवसायाचा मार्ग बदलला. कोरोना परिस्थितीमुळे गत १४ महिन्यापासून लग्नसमारंभ तसेच सार्वजनिक उत्सवात बॅण्डबाजाची धमाल करणारे हात आता बॅण्डबाजाऐवजी हातात तराजू घेऊन हातगाडीवर ठेला लावून टरबूज, डांगर आणि उन्हाळी फळे विकताना दिसून येत आहेत.

काटोल शहरात अनेक नामांकित बॅण्ड पार्टी आहेत. लग्नसमारंभ, सार्वजनिक उत्सव तसेच धार्मिक कार्यक्रमात या बॅण्डबाजाचा गजर निराळाच असतो. मात्र या व्यवसायात काम करणारे सध्या आर्थिक अडचणीत आहेत. सरकारने गतवर्षी लॉकडाऊनची घोेषणा केली. यात लग्न समारंभाला ५० नागरिकांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली. कार्यक्रमात बॅण्डबाजावर बंदी घालण्यात आली. त्यामुळे ऐन लग्नसराईत बॅण्ड व्यावसायिकांना फटका बसला. लग्नसमारंभाच्या तारखा बुक झाल्या होत्या. त्यानुसार बॅण्ड कंपनीतील सर्व सहकाऱ्यांना अ‍ॅडव्हान्स स्वरूपात पैसेसुद्धा देण्यात आले होते. एकदम लॉकडाऊन लागल्याने येणारे पैसे तर गेलेच मात्र सहकाऱ्यांना दिलेले अ‍ॅडव्हान्ससुद्धा बुडाले. यावर्षी परिस्थिती बदलेल, नव्याने व्यवसाय सुरू होईल, अशी आशा होती. मध्यंतरी परिस्थिती सावरली. नव्याने व्यवसायाची उभारणी करून तयारी पूर्ण झाली. ऑर्डरसुद्धा आले. मात्र आणखी कोरोनाचा उद्रेक झाला. पुन्हा कडक निर्बंध लागले. त्यामुळे यंदाही व्यवसाय बुडाला.

--

लग्नसमारंभ, साक्षगंध, स्वागत समारंभ, अंत्यसंस्कार, तेरवी आदी कार्यक्रमात बॅण्डची मागणी असते. जवळजवळ ५० सहकारी बॅण्ड पार्टीत कामाला होते. मात्र कोरोनाने व्यवसाय बंद झाला. आता मिळेल तो व्यवसाय करून जगणे आणि परिवाराचे पोट भरणे हाच एकमेव पर्याय आहे. याच गरजेतून मी आज फळ विक्रीचे काम करीत आहे.

किशोर गायकवाड

संचालक, समर्थ बॅण्ड, काटोल

Web Title: Scales instead of bandbajas in the hands of the band master!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.