नागपूरच्या पूनम अर्बन क्रेडिट सोसायटीत घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 12:31 AM2019-07-03T00:31:55+5:302019-07-03T00:32:56+5:30

पूनम अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी संगनमत करून ठेवीदारांचे लाखो रुपये हडपले. वारंवार मागणी करूनही आपली रक्कम परत मिळत नसल्याचे पाहून गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. सक्करदरा ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त मंगळवारी सर्वत्र पसरल्याने संबंधित वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

Scam in Poonam Urban Credit Society of Nagpur | नागपूरच्या पूनम अर्बन क्रेडिट सोसायटीत घोटाळा

नागपूरच्या पूनम अर्बन क्रेडिट सोसायटीत घोटाळा

googlenewsNext
ठळक मुद्देपदाधिकाऱ्यांनी हडपले लाखो रुपये : गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड खळबळ : सक्करदऱ्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पूनम अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी संगनमत करून ठेवीदारांचे लाखो रुपये हडपले. वारंवार मागणी करूनही आपली रक्कम परत मिळत नसल्याचे पाहून गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. सक्करदरा ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त मंगळवारी सर्वत्र पसरल्याने संबंधित वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
पूनम अर्बनचे संचालक आणि अधिकारी ठेवीदारांना आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून त्यांना आपल्या सोसायटीत रक्कम गुंतवण्यास भाग पाडत होते. हर्षवर्धन श्रावण झंजाळ (वय ५४) हे खरबी मार्गावरील शेषनगरात राहतात. त्यांनी सक्करदरा ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीनुसार, पूनम अर्बनचे संचालक आणि व्यवस्थापक यांनी त्यांना आमच्या सोसायटीत गुंतवणूक केल्यास अल्पावधीत भरपूर परतावा मिळतो, असे सांगून खाते उघडण्यास बाध्य केले होते. त्यामुळे झंजाळ यांनी १७ मार्च २०१८ ला खाते उघडून ४९,९९२ रुपये, त्यानंतर ५१,६९५ रुपये आणि नंतर १ लाख १,६८७ रुपयांची एफडी केली. २८ जून २०१९ ला मुदत संपल्यानंतर त्यांनी सोसायटीच्या संचालक आणि व्यवस्थापकांकडे रक्कम परत मागितली. मात्र, त्यांनी बरेच दिवस टाळाटाळ करून अलीकडे रक्कम परत करण्यास असमर्थता दर्शविली. झंजाळ यांच्यासारखेच अनेकांचे लाखो रुपये हडपून सोसायटीच्या संचालक आणि अधिकाऱ्यांनी हात वर केले आहे. त्यामुळे या सर्वांनीच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या. प्रकरण चिघळण्याचे संकेत मिळाल्याने सोमवारी रात्री वरिष्ठांनी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, सक्करदरा पोलिसांनी पूनम अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र, मंगळवारी रात्रीच्या पोलीस प्रेसनोटमध्ये आरोपींची नावे देण्याचे सक्करदरा पोलिसांनी टाळले. त्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
तक्रारी करणाऱ्यांची नावे
श्याम तेलंग : सात लाख रुपये
उज्ज्वला पाटील : साडेतीन लाख रुपये
ज्ञानेश्वर केचे : ३ लाख ३० हजार रुपये
शिवानी चांदेकर : एक लाख ५ हजार रुपये
संदीप केचे : तीन लाख रुपये
अंबादास तायडे : २ लाख ९५ हजार २९४ रुपये
शीतल काटेकर : १५ लाख २४ हजार
कुबेर मिश्रा : चार लाख रुपये

Web Title: Scam in Poonam Urban Credit Society of Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.