९८१ विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:12 AM2021-08-13T04:12:39+5:302021-08-13T04:12:39+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क वाडी : नागपूर (ग्रामीण) तालुक्यातील वाडी, धामणा, बुटीबोरी, फेटरी, गोधनी(रेल्वे), हुडकेश्वर खापरी (रेल्वे), परसोडी फार्म येथील ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
वाडी : नागपूर (ग्रामीण) तालुक्यातील वाडी, धामणा, बुटीबोरी, फेटरी, गोधनी(रेल्वे), हुडकेश्वर खापरी (रेल्वे), परसोडी फार्म येथील १३ केंद्रावर पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता पाचवी) व पूर्व माध्यमिक (इयत्ता आठवी) शिष्यवृत्ती परीक्षेला एकूण ९८१ तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेकरिता पाच केंद्रांवर ४१९ पैकी ३७० विद्यार्थी परीक्षेला बसले.
श्री विश्वनाथ बाबा हायस्कूल येथील केंद्रावर ७४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. केंद्र संचालकाची जबाबदारी प्राचार्य जयकिशोर जयस्वाल यांनी पार पाडली. सावित्रीबाई फुले विद्यालय फेटरी केंद्रावर ६७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या केंद्रावर डी. के. सहारे यांनी केंद्र संचालकाची जबाबदारी पार पाडली. बालाजी काॅन्व्हेंट बुटीबोरी केंद्रावर १०४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. जयश्री राऊत यांनी केंद्र संचालक म्हणून काम पाहिले. आदर्श संस्कार विद्यालय हुडकेश्वर केंद्रावर ६७, उत्कर्ष माध्यमिक विद्यामंदिर परसोडी फार्म केंद्रावर ५८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आठ केंद्रावर ६९८ पैकी ६१० विद्यार्थी परीक्षेला बसले. यात जवाहरलाल नेहरू उच्च प्राथमिक शाळा वाडी केंद्रावर ८७, अंजनाबाई वानखेडे विद्यालय धामणा केंद्रावर ३९, बालाजी कॉन्व्हेंट बुटीबोरी केंद्रावर ८५, पुरुषोत्तम विद्यानिकेतन बोरखेडी केंद्रावर ५२, जि.प. उच्च प्राथमिक शाळा फेटरी केंद्रावर ४८, जि.प. उच्च प्राथमिक शाळा गोधनी (रेल्वे) केंद्रावर ५०, सेंट पॉल स्कूल हुडकेश्वर केंद्रावर १२७ तसेच जि.प. उच्च प्राथमिक शाळा खापरी (रेल्वे ) केंद्रावर १२३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. सर्व परीक्षा केंद्रावर गटशिक्षणाधिकारी राजेशकुमार लोखंडे, शिक्षण विस्तार अधिकारी रामराव मडावी, शिक्षण विस्तार अधिकारी शरद भांडारकर, शिक्षण विस्तार अधिकारी प्रेमा दिघोरे, केंद्रप्रमुख किशोर गमे, हेमचंद भानारकर, रामकृष्ण ढोले, मोहन जुमडे, चंद्रकांत मासूरकर, संजय गुजरकर, श्यामसुंदर शेंबेकर, प्रकाश सव्वालाखे यांनी भेट देऊन समाधान व्यक्त केले. तालुक्यातील १३ केंद्रावर कुठलाही गैरप्रकार आढळून आला नाही.
120821\img-20210812-wa0120.jpg
photo