शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:09 AM2021-05-08T04:09:55+5:302021-05-08T04:09:55+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क हिंगणा : इयत्ता पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे सुपरविजन करण्याबाबतचे पत्र परीक्षा परिषदेने काही शिक्षकांना ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
हिंगणा : इयत्ता पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे सुपरविजन करण्याबाबतचे पत्र परीक्षा परिषदेने काही शिक्षकांना पाठविले आहे. सध्याचा काेराेना संक्रमण काळ विचारात घेता, या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्या, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या सदस्यांनी केली असून, यावर निर्णय न घेतल्यास या परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
इयत्ता पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षा हाेऊ घातल्या आहेत. त्याअनुषंगाने परीक्षा परिषदेने ५ मे राेजी काही शिक्षकांना या परीक्षेचे सुपरविजन करण्याबाबत पत्र पाठविले आहे. या पत्रामुळे शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. काेराेना संक्रमण लक्षात घेता या परीक्षा पुढे ढकलाव्या, अशी मागणी राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडे यापूर्वीच निवेदनाद्वारे करण्यात आली हाेती. मात्र, शासनाने यावर काहीही निर्णय घेतला नाही. त्यामुळे शिक्षकांमधील संभ्रम वाढला आहे.
विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होत असताना शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत शासनाने आग्रही भूमिका घ्यायला नकाे. राज्यातील सहा लाखपेक्षा अधिक विद्यार्थी ही परीक्षा देणार आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर किमान २०० ते ५०० परीक्षार्थी तसेच पर्यवेक्षक व इतर कर्मचारी असणार आहेत. त्यातच शाळांना २ मे ते २८ जून या काळात उन्हाळी सुट्या असल्याने बहुतांश शिक्षक मूळ गावी गेले आहेत. काेराेनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता, ही परीक्षा धाेकादायक ठरू शकते. त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे योगेश बन, सुनील पाटील, रंजना कावळे, जुगल बोरकर, विलास बोबडे, विजय साळवे यांच्यासह अन्य पदाधिकारी व सदस्यांनी केली असून, परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.