यूपीएससीची तयारी करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना विद्यावेतन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 09:28 AM2020-11-22T09:28:50+5:302020-11-22T09:28:50+5:30
दरवर्षी राज्यातून २५ विद्यार्थ्यांची निवड करून, यूपीएससीच्या तयारीसाठी त्यांना दरमहा १२ हजार रुपये विद्यावेतन व १४ हजार रुपये पुस्तक ...
दरवर्षी राज्यातून २५ विद्यार्थ्यांची निवड करून, यूपीएससीच्या तयारीसाठी त्यांना दरमहा १२ हजार रुपये विद्यावेतन व १४ हजार रुपये पुस्तक खरेदीसाठी असे २६ हजार रुपये देणार आहे. हा निधी त्यांना तीन महिन्याकरीता देण्यात येणार आहे. यूपीएससीच्या पूर्व परीक्षांचा निकाल जाहीर झाल्यानंतर त्यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दहावी, बारावी, पदवी परीक्षेमध्ये प्राप्त गुणांची सरासरी काढून निवड करण्यात येणार आहे. राज्यातील आदिवासींच्या ४५ जमाती व त्यांच्या उपजमाती वास्तव्यास आहेत. राज्यातील ९ विद्यापीठांमधून यूपीएससीचे प्रशिक्षण सुरू आहे. प्रत्येक विद्यापीठात २५ विद्यार्थ्यांना प्रशिक्षण मिळत आहे. अशात फक्त राज्यात २५ लाभार्थ्यांची विद्यावेतनासाठी निवड होणार आहे. हा कोटा अतिशय कमी असून, राज्यात किमान १०० विद्यार्थ्यांची निवड व्हावी, अशी मागणी आदिवासी विकास परिषदेचे अध्यक्ष दिनेश शेराम यांनी केली आहे.