जलालखेडा येथे शाळेची घंटा वाजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:09 AM2021-07-27T04:09:22+5:302021-07-27T04:09:22+5:30
जलालखेडा : जलालखेडा येथील एस.आर.के इंडो पब्लिक स्कूल येथे सोमवारपासून ८ ते १० वीचे वर्ग सुरू करण्यात आले आहे. ...
जलालखेडा : जलालखेडा येथील एस.आर.के इंडो पब्लिक स्कूल येथे सोमवारपासून ८ ते १० वीचे वर्ग सुरू करण्यात आले आहे. शासनाने दिलेल्या परवानगीच्या आधारावर नियमांचे पालन करत विद्यार्थांना सोमवारपासून शाळेत बोलावण्यात आले आहे. कोरोनामुळे मागील दीड वर्षांपासून शाळा बंद होत्या. गत २ महिन्यांपासून दुसरी लाट ओसरत आहे. तसेच लसीकरण मोठ्या प्रमाणात सुरू असल्यामुळे व रुग्ण नसल्यामुळे शासनाने वर्ग ८ ते १२ वी सुरू करण्याची परवानगी दिली आहे. शाळेत फिजिकल डिस्टन्स ठेवत विद्यार्थांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच शाळेचे निर्जंतुकीकरण करून मुलांसाठी सॅनिटायजर, विद्यार्थांचे तापमान मोजणे अशा सर्व नियमाचे पालन करत वर्ग सुरू करण्यात आले आहे. सोमवारी शाळेच्या पहिल्या दिवशी प्राचार्य व शिक्षकांनी विद्यार्थांचे पुष्प देऊन स्वागत केले. यावेळी प्राचार्य शुभांगी अर्डक, प्रियंका देशमुख, प्रशांत येवले, नलिनी मुदगल, हेमलता गोरे, रक्षा शुक्ला उपस्थित होते.
260721\img_20210726_094320.jpg
फोटो ओळी. विद्यार्थांचा शाळेतील पहिला दिवस असल्यामुळे विद्यार्थांचे पुष्प देऊन स्वागत करताना प्राचार्य शुभांगी अर्डक व शिक्षक.