नागपूरनजीकच्या हिंगण्यात शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 12:12 AM2019-09-11T00:12:24+5:302019-09-11T00:14:13+5:30

शाळकरी मुलीला मोटरसायकलवर बसवून नेऊन दोघांनी तिच्यावर बलात्कार केला तर दोघांनी तिचा विनयभंग केला. हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी ८ सप्टेंबरच्या रात्री घडलेल्या या घटनेनंतर सदर मुलीचे पालक आणि आरोपीच्या पालकांमध्ये जोरदार वाद झाला.

School girl gang raped in Hingna near Nagpur | नागपूरनजीकच्या हिंगण्यात शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार

नागपूरनजीकच्या हिंगण्यात शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार

Next
ठळक मुद्देदोघांनी केले लज्जास्पद वर्तन : मोटरसायकवर बसवून स्मशानात नेले

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणा/नागपूर : शाळकरी मुलीला मोटरसायकलवर बसवून नेऊन दोघांनी तिच्यावर बलात्कार केला तर दोघांनी तिचा विनयभंग केला. हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी ८ सप्टेंबरच्या रात्री घडलेल्या या घटनेनंतर सदर मुलीचे पालक आणि आरोपीच्या पालकांमध्ये जोरदार वाद झाला. त्यानंतर हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहचले.
मुलगी १३ वर्षांची आहे. तिचे नात्यातीलच एकासोबत स्नेहसंबंध होते. नैसर्गिक विधीसाठी मुलगी रविवारी रात्री ११.३० ला एकटीच बाहेर गेली. परत येताना स्नेहसंबंध असणाऱ्या आरोपीने तिला मित्राच्या मोटरसायकलवर बसवले; सोबत त्याचा एक मित्र आणि नंतर पुन्हा दोन साथीदार होते. या चौघांनी तिला गावाबाहेरच्या स्मशानभूमीत नेले. तेथे दोघांनी तिच्यावर अत्याचार केला तर एकाने प्रयत्न केला. चौथ्याने लज्जास्पद वर्तन केले. हा प्रकार झाल्यानंतर मुलगी नातेवाईकांकडे निघून गेली. दरम्यान, मुलगी रात्रभर घरी परतली नाही म्हणून घरच्यांनी तिची शोधाशोध केली. ती आरोपीशी संबंधित एका नातेवाईकाच्या घरी आढळल्यानंतर मुलीच्या पालकांनी तिला खडसावून रात्रभर कुठे होती, अशी विचारणा केली. त्यानंतर उपरोक्त प्रकरणाची माहिती तिने पालकांना दिली. या प्रकरणात कधी तिघांनी तर कधी दोघांनी बलात्कार केल्याचे सांगितले जात होते.
दरम्यान, मुलीकडून हा प्रकार ऐकल्यानंतर तिच्या पालकांनी आरोपी आणि त्यांच्या नातेवाईकांना जाब विचारला. त्यावरून मोठा वाद झाला. काही नातेवाईकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही पालकांनी आरोप-प्रत्यारोप केल्यामुळे समेटाचे प्रयत्न फिस्कटले. त्यानंतर मुलीच्या पालकांनी हिंगणा ठाण्यात तक्रार नोंदवली. प्रकरण सामूहिक बलात्काराचे असल्याने हिंगणा पोलिसांनी अपहरण करून बलात्कार करणे, विनयभंग करणे, धमकी देणे आदी आरोपाखाली पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणात पोलिसांनी अनुसुचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्याचे कलमही लावले.
दोन आरोपी अल्पवयीन
या प्रकरणात चार आरोपी आहेत. त्यातील दोन अल्पवयीन असून, आरोपी अमित जयप्रकाश ठाकूर (वय १८) आणि बलवंत गोंड (वय २०) हे दोघे सज्ञान आहेत. त्यांनीच बलात्कार केल्याचे समजते. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी अमित ठाकूरला अटक केली तर, एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले. दोन फरार आहेत.

Web Title: School girl gang raped in Hingna near Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.