पक्ष्यांचे घरटे बनवण्यासाठी सरसावली शाळकरी चिमुकली..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 06:51 PM2020-05-14T18:51:32+5:302020-05-14T18:54:12+5:30

अभिग्यान फाऊंडेशनचा सदस्य असलेल्या प्रणयने मुलांसाठी विविध उपक्रम राबविले आहे. मुलांना निसर्गाच्या जवळ घेऊन जाण्याच्या हेतूने मुलांकडून घरातील टाकाऊ वस्तूंच्या माध्यमातून पक्षांसाठी घरटे बनविले आहेत. हे घरटे आता मुले घराच्या वरांड्यात अथवा घरी असलेल्या झाडावर ते टांगणार आहेत.

school kids made bird's nest | पक्ष्यांचे घरटे बनवण्यासाठी सरसावली शाळकरी चिमुकली..

पक्ष्यांचे घरटे बनवण्यासाठी सरसावली शाळकरी चिमुकली..

Next
ठळक मुद्देलॉकडाऊनच्या फावल्या वेळेचा सदुपयोगयोगासने, प्राणायाम, सूर्यनमस्कार शिकण्यात घालवताहेत वेळ


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : फावला वेळ मुलांसाठी अत्यंत कंटाळवाणा असतो. अभ्यासाव्यतिरिक्त मुलांना खेळायला मिळाले नाही तर त्यांचे मानसिक खच्चीकरण होत असते. त्यामुळे, फावला वेळ हा सदुपयोगात घालवता आला नाही तर कठीण असते. ही स्थिती विचारात घेता ओमनगर येथील प्रणय भजभुजे या युवकाने मुलांसाठी वेगवेगळ्या उपाययोजनांद्वारे मुलांना गुंतवून ठेवण्याची शक्कल लढवली आणि त्यात तो यशस्वी झाला आहे.
अभिग्यान फाऊंडेशनचा सदस्य असलेल्या प्रणयने मुलांसाठी विविध उपक्रम राबविले आहे. त्याच अभियानातून मुलांकडून वेगवेगळे आविष्कार घडविण्याची किमया त्याने साधली आहे. मुलांना निसर्गाच्या जवळ घेऊन जाण्याच्या हेतूने मुलांकडून घरातील टाकाऊ वस्तूंच्या माध्यमातून पक्षांसाठी घरटे बनविले आहेत. हे घरटे आता मुले घराच्या वरांड्यात अथवा घरी असलेल्या झाडावर ते टांगणार आहेत. यासोबतच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थेट लढा देत असलेल्या डॉक्टर्स, परिचारिका, पोलीस, स्वच्छता दूत यांच्याविषयी मुलांमध्ये कृतज्ञता भाव निर्माण व्हावा म्हणून चित्रकला स्पधेर्चे आयोजन करण्यात आले होते. चित्रकला स्पर्धा एकवेळ विषय देऊन मुलांकडून ते काढून घेणे सोपे असते. मात्र, घरटे बनविणे सोपे नव्हते. तेव्हा फिजिकल डिस्टेन्सिंगची काळजी घेत, सॅनिटायजरचा वेळोवेळी वापर करत आणि मास्क अत्यावश्यक ठरवून मुलांकडून ते स्वत: बनवून घेतले गेले आहेत. शिवाय मुलांना सकाळच्या समयी सूर्यनमस्कार, योगासने, प्राणायामचे धडे देऊन त्यांच्या फिजिकल अक्टिव्हिटीलाही वाव देण्याचे प्रयत्न प्रणयने साधले आहे. या उपक्रमात रिनित नागपुरे, ओम हजारे, रियान चौधरी, यश हलबे, अर्श ठाकरे, लक्की नखाते, शिनू हलबे या चिमुकल्यांनी सहभाग घेतला आणि या सर्व उपक्रमांमध्ये सहभाग घेतला.

Web Title: school kids made bird's nest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.