स्कूल ऑफ स्कॉलर्सला
By | Published: November 26, 2020 04:21 AM2020-11-26T04:21:49+5:302020-11-26T04:21:49+5:30
नागपूर : स्कूल ऑफ स्कॉलर्स, अत्रे ले-आऊटने शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला आहे. क्यूएस आय-गेज ई-लर्निंग एक्सलन्स फॉर ...
नागपूर : स्कूल ऑफ स्कॉलर्स, अत्रे ले-आऊटने शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला आहे. क्यूएस आय-गेज ई-लर्निंग एक्सलन्स फॉर अकॅडमिक डिजिटायझेशन (ई-लिड) प्रमाणपत्र मिळविणारी एकमेव आणि देशातील पहिली शाळा ठरली आहे. स्कूल ऑफ स्कॉलर्समध्ये जागतिक दर्जाच्या वर्गखोल्या असताना कोरोना महामारीच्या काळात त्यांचे डिजिटल रूपांतरण घेऊन पुढे गेली आणि शाळा ऑनलाईन वर्गातून विद्यार्थ्यांच्या घरी पोहोचली. दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शाळेकडे नेहमीच एक भविष्यवादी दृष्टिकोन आहे. यामुळे आता दोन वर्षांपासून गुगल क्लासरूम आणि मायक्रोसॉफ्ट एस्पायर स्टुडंट प्रोग्रामद्वारे मिश्रित शिक्षण देण्यात येत आहे. या अनुभवाने कोरोना काळात शाळेने स्वत:च्या कार्यप्रदर्शनाचे मूल्यांकन केले आणि क्यूएस आय-गेज ई-लर्निंग एक्सलन्स फॉर अकॅडमिक डिजिटायझेशन (ई-लिड) प्रमाणपत्राची नोंदणी केली. क्यूएस-एरा इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने स्कूल ऑफ स्कॉलर्स, अत्रे ले-आऊट, नागपूर, महाराष्ट्र येथे हे प्रमाणपत्र प्रदान केले. शाळेचे मुख्य सल्लागार देविका मेघे, संचालक आभा मेघे, एजीएसचे संचालक (प्रशिक्षण व पुढाकार) अजिंक्य अंबरखणे आणि आयटीसी हेड रिसोर्स सेंटरच्या सबिता विनोद यांनी दिलेल्या मार्गदर्शनाचे आभार मानले आहे. व्यवस्थापनाने प्राचार्य रेखा नायर यांचे उल्लेखनीय कामगिरीसाठी कौतुक केले आहे. (वा.प्र.)