भूगाव, कान्हाेलीबारा येथील शाळा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:07 AM2021-07-16T04:07:56+5:302021-07-16T04:07:56+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क गुमथळा/हिंगणा : काेराेना संक्रमणानंतर राज्य शासनाच्या निर्देशानुसार कामठी तालुक्यातील भूगाव येथील स्नेही विकास विद्यालय व हिंगणा ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
गुमथळा/हिंगणा : काेराेना संक्रमणानंतर राज्य शासनाच्या निर्देशानुसार कामठी तालुक्यातील भूगाव येथील स्नेही विकास विद्यालय व हिंगणा तालुक्यातील श्रीकृष्ण हायस्कूलमध्ये इयत्ता आठवी ते दहावीचे वर्ग सुरू करण्यात आले. या दाेन्ही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यापूर्वी काेराेना प्रतिबंधक सर्व उपाययाेजनांचे काटेकाेर पालन करण्यात आले हाेते.
काेराेना संक्रमण काळात सर्व शाळा दीड वर्ष बंद हाेत्या. राज्य शासनाच्या निर्देशानुसार स्नेही विकास विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रदीप मेशकर यांनी भूगावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच केंद्र प्रमुख गिरीधर माकडे यांच्याशी चर्चा केली. श्रीकृष्ण विद्यालयाचे मुख्याध्यापक अशाेक कुकडकर यांनी कान्हाेलीबाराचे सरपंच जितेंद्र बाेटरे व केंद्र प्रमुख मनाेज मानकर यांच्याशी शाळा सुरू करण्यासंदर्भात चर्चा केली हाेती. सर्वांनी सहमती दर्शविल्याने या दाेन्ही शाळा सुरू करण्यात आल्या.
पालकांनी संमती दिल्याने पहिल्या दिवशी स्नेही विकास विद्यालयात इयत्ता दहावीचे १६ विद्यार्थी उपस्थित हाेते. यात १२ विद्यार्थिनी व चार विद्यार्थ्यांचा समावेश हाेता. श्रीकृष्ण विद्यालयात इयत्ता आठवी ते दहावीचे एकूण १९३ विद्यार्थी उपस्थित हाेते. शाळेला सुरुवात करण्यापूर्वी प्रत्येक वर्गखाेलीचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. शिवाय, प्रत्येक विद्यार्थ्याचे थर्मल स्किनिंग व हॅण्ड सॅनिटायझेशनही करण्यात आले. स्नेही विकास विद्यालयात सुरेश नांदूरकर, केशव बेलखुडे, लीला आंबिलडुके आदी शिक्षक हजर हाेते. केंद्र प्रमुख गिरीधर माकडे यांनी शाळेची तपासणी केली.
...
कुही तालुक्यात सर्व शाळा बंद
कुही तालुक्यात ४५ माध्यामिक व सात जिल्हा परिषदेच्या उच्च माध्यमिक शाळा आहेत. या ५२ शाळांपैकी एकही शाळा गुरुवारी (दि. १५) सुरू करण्यात आली नाही. या सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी त्यांच्या गावांमधील सरपंच, ग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्यांशी शाळा सुरू करण्यासंदर्भात चर्चा केली. परंतु, काेणत्याही ग्रामपंचायतने याबाबत ठराव घेऊन सकारात्मक निर्णय घेतला नाही. त्यामुळे कुही तालुक्यातील एकही शाळा सुरू करण्यात आली नाही, अशी माहिती कुहीच्या गटशिक्षणाधिकारी शारदा किनारकर यांनी दिली.