शिक्षकांचीच भरली शाळा, वर्ग सुनेसुने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:06 AM2021-06-29T04:06:45+5:302021-06-29T04:06:45+5:30

नागपूर : उन्हाळ्याच्या दोन महिन्यांच्या सुट्ट्या मनसोक्त लुटल्यानंतर मुलांना प्रतीक्षा असते ती शाळेची. त्यात शाळेचा पहिला दिवस म्हणजे उत्साहाची ...

Schools full of teachers, classrooms | शिक्षकांचीच भरली शाळा, वर्ग सुनेसुने

शिक्षकांचीच भरली शाळा, वर्ग सुनेसुने

googlenewsNext

नागपूर : उन्हाळ्याच्या दोन महिन्यांच्या सुट्ट्या मनसोक्त लुटल्यानंतर मुलांना प्रतीक्षा असते ती शाळेची. त्यात शाळेचा पहिला दिवस म्हणजे उत्साहाची पेरणीच. मुलांचे होणारे स्वागत, मिळणारा खाऊ, नवीन पुस्तके, नवीन गणवेश, तोरणे, पताकांनी सजविलेल्या शाळा, विद्यार्थ्यांचा किलबिलाट, शिक्षकांची पळापळ, नवीन मित्र-मैत्रिणींची भेट वर्षानुवर्षे शाळेचा पहिला दिवस मुलांसाठी आनंदाची पर्वणीच असायचा. पण मागच्या सत्रापासून शाळेचा प्रवेशोत्सव, विद्यार्थ्यांचा किलबिलाट सर्व शांत झालाय. कोरोनाच्या भीतीने शाळांना निर्जीव करून सोडलेय. २८ जून रोजी विदर्भातील शाळांना सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी शाळांची हतबलता अनुभवायला आली.

शासनाच्या आदेशानुसार पहिल्या दिवशी टीचर्स रूममध्ये शिक्षकांची उपस्थिती १०० टक्के होती. पण वर्ग मात्र सुनेसुनेच होते. काही शाळांनी ऑनलाईनद्वारे प्रवेशोत्सव साजरा केला. पण ग्रामीण भागातील विद्यार्थी शाळा सुरू होण्याच्या प्रतीक्षेतच होते. कोरोना महामारीने शाळांवर मोठा आघात केला आहे. शाळांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. शिक्षण, संस्कार, शिस्त आणि भविष्याच्या जडणघडणीत मोलाचे योगदान ठरणाऱ्या या मंदिराची शासनालाही भीती वाटायला लागली आहे. शाळाच सुरू नसल्याने शिक्षणाचा प्रवाह थांबलेला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन काही प्रयत्न झालेत. पण शाळेबद्दलचे ते भाव उमटू शकले नाही. गेल्या सत्रात तर विद्यार्थी शाळेपासून दूरच गेले. यंदा विद्यार्थी पालकांना अपेक्षा होती की शाळा सुरू होईल; पण शासनाने तिसऱ्या लाटेच्या धास्तीत शाळा बंदच ठेवल्या. यात शासनाचाही दोष नाहीच. पण विद्यार्थी बिचारे शाळेची आस लावून आहेत.

आज शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शाळेच पोहचले. मुख्याध्यापकांनी बैठकी घेऊन शिक्षकांना काम सोपविले. काही शिक्षकांची सेवा कोरोनासाठी प्रशासनाने अधिग्रहित केली आहे. त्यांची सुटका त्यातून काही झालेली नाही. जे शिक्षक शाळेत पोहोचले त्यांनी आपापल्या वर्गाकडे नजर फेरली, खंत व्यक्त करीत शाळा संपण्याची प्रतीक्षा करीत बसले. पण काही शाळांनी या निराशामय वातावरणातही सकारात्मकता पेरण्याचा प्रयत्न केला. ऑनलाईनच्या माध्यमातून का होईना प्रवेशोत्सव साजरा केला.

- आम्ही प्रवेशोत्सवाचे व्हर्च्यूअल सेलिब्रेशन केले. सर्व क्लास टीचर्स आपापला मोबाईल घेऊन वर्गात गेल्या. यू-ट्युब व गुगल मीटच्या माध्यमातून विद्यार्थी जुळले. मुलांना त्यांचे वर्गशिक्षक, त्यांचा वर्ग दाखविण्यात आला. प्रार्थना घेण्यात आली. जवळपास अकराशेच्यावर विद्यार्थी व पालकांनी प्रतिसाद दिला. संस्थेचे अध्यक्ष, प्राचार्य यांनी मुलांना मार्गदर्शन केले. मुले खूश झाली, पालकही आनंदी होते. पहिल्याच दिवशी ७५ टक्के मुलांची उपस्थिती असल्याचे डीडी नगर विद्यालयाच्या प्राचार्य अर्चना जैनाबादकर यांनी सांगितले.

- ऑनलाईन शाळा सुरू होणार यासंदर्भात पालकांच्या मोबाईलवर लिंक पाठविली होती. ७० टक्के मुले ऑनलाईन वर्गात सहभागी झाले. आम्ही मुलांना शाळेची ओळख, वर्ग शिक्षकांची ओळख, त्यांचा परिचय करून दिला. प्रत्येक वर्गात असा उपक्रम घेण्यात आला. मुलांमध्ये शाळेबद्दलचे कुतुहल दिसून आल्याचे श्री सत्यसाई कॉन्व्हेंटचे मुख्याध्यापक नीलेश सोनटक्के यांनी सांगितले.

- विद्यार्थ्यांशिवाय शाळा सुरू झाल्या. शिक्षक उपस्थित होते. ऑनलाईन शिक्षणही सुरू झाले. पण जिवंतपणा नव्हता. प्रत्यक्ष शाळा कधी सुरू होतील, याची सर्व शिक्षकांना आतुरता आहे.

-अनिल शिवणकर, शिक्षक

Web Title: Schools full of teachers, classrooms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.