कमी पटसंख्येच्या शाळा बंद होणार नाही : शिक्षणमंत्री शेलार यांची माहिती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 10:28 PM2019-07-01T22:28:51+5:302019-07-01T22:30:25+5:30

जिल्हा परिषदेच्या ३८७ शाळांची पटसंख्या २० पेक्षा कमी आहे. शिक्षण सचिवांनी एका व्हिडीओ कॉन्फरन्सींगमध्ये कमी पटसंख्येच्या शाळांचे समायोजन करण्यासंदर्भात विचार केला होता. त्यामुळे जिल्ह्यातील ३८७ शाळा बंद होतील, अशी चर्चा सुरू झाली होती. यासंदर्भात आमदार प्रा. अनिल सोले, नागो गाणार, रामदास आंबटकर यांनी पावसाळी अधिवेशनात लक्षवेधीच्या माध्यमातून मुद्दा उपस्थित केला. याला उत्तर देताना शिक्षणमंत्री अ‍ॅड. आशिष शेलार म्हणाले की, या शाळा बंद करण्याचा शासनाचा विचार नाही. पण पटसंख्या कमी होण्याची कारणे शोधण्यासाठी सत्यशोधन समिती गठित करण्यात येईल, असेही सांगितले.

Schools of lesser population will not be closed: Education Minister Shelar's information | कमी पटसंख्येच्या शाळा बंद होणार नाही : शिक्षणमंत्री शेलार यांची माहिती 

कमी पटसंख्येच्या शाळा बंद होणार नाही : शिक्षणमंत्री शेलार यांची माहिती 

Next
ठळक मुद्देसत्यशोधन समिती गठित करण्यात येईल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हा परिषदेच्या ३८७ शाळांची पटसंख्या २० पेक्षा कमी आहे. शिक्षण सचिवांनी एका व्हिडीओ कॉन्फरन्सींगमध्ये कमी पटसंख्येच्या शाळांचे समायोजन करण्यासंदर्भात विचार केला होता. त्यामुळे जिल्ह्यातील ३८७ शाळा बंद होतील, अशी चर्चा सुरू झाली होती. यासंदर्भात आमदार प्रा. अनिल सोले, नागो गाणार, रामदास आंबटकर यांनी पावसाळी अधिवेशनात लक्षवेधीच्या माध्यमातून मुद्दा उपस्थित केला. याला उत्तर देताना शिक्षणमंत्री अ‍ॅड. आशिष शेलार म्हणाले की, या शाळा बंद करण्याचा शासनाचा विचार नाही. पण पटसंख्या कमी होण्याची कारणे शोधण्यासाठी सत्यशोधन समिती गठित करण्यात येईल, असेही सांगितले.
राज्यातील मराठी शाळेतील २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा विचार शासनाकडून होत आहे. नागपूर जिल्ह्यात ३८७ शाळा २० पेक्षा कमी पटसंख्येच्या असून, १ ते ५ पटसंख्येच्या ३४ शाळा आहे. लोकमतने सर्वप्रथम जिल्हा परिषदेच्या कमी पटसंख्येच्या शाळा बंद होणार यासंदर्भातील वृत्त प्रकाशित केले होते. या सर्व शाळा मराठी माध्यमाच्या असल्याने, शहरातील काही संस्थांनी मराठी शाळा बंद पाडण्याच्या शासन धोरणाला विरोध केला होता. यासंदर्भात आमदार प्रा. अनिल सोले, नागो गाणार यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहात हा मुद्दा उपस्थित केला. कमी पटसंख्येच्या संदर्भात विविध मुद्दे उपस्थित करून, शासनाने शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचा उल्लेख केला होता.
यासंदर्भात उत्तर देताना शेलार म्हणाले की, गेल्यावर्षी शासनाने १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या १२९२ शाळेचे समायोजन नजीकच्या शळेत करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. पण काही भौगोलिक कारणाने अडचणी येत असल्याचे लक्षात आल्याने जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना स्थानिक पडताळणी करून समायोजन करावे, अशा सूचना दिल्या होत्या. गेल्यावर्षी ३९१ शाळांचे समायोजन करण्यात आले. यावर्षी राज्यात १३५४४ शाळा २० पेक्षा कमी पटसंख्येच्या आहे. तर ४७४९ शाळा १० पेक्षा कमी पटसंख्येच्या आहे.

Web Title: Schools of lesser population will not be closed: Education Minister Shelar's information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.